

भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध जेव्हा मोटेराच्या मैदानात तिसरी टेस्ट खेळण्यासाठी उतरेल तेव्हा सगळ्यांची नजर ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin)वर असेल. या मॅचमध्ये अश्विन एक मोठं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करू शकतो. अश्विनला भारताकडून सगळ्यात जलद 400 टेस्ट विकेट पूर्ण करण्याची संधी आहे. (Photo- AP)


अश्विनने आतापर्यंत 76 टेस्टमध्ये 394 विकेट घेतल्या आहेत. जर मोटेरावर त्याला आणखी 6 विकेट घेता आल्या तर तो सगळ्यात जलद 400 विकेट घेणारा भारतीय खेळाडू ठरेल. सध्या हे रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने 85 टेस्टमध्ये हा विक्रम केला होता. (Photo- AP)


सगळ्यात जलद 400 टेस्ट विकेट पूर्ण करण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने 72 टेस्टमध्ये हा आकडा पार केला होता. मोटेरामध्ये 6 विकेट घेतल्या तर अश्विन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. (Photo- Murlidharan Facebook)