मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : भारतीय स्पिनर्सची पुन्हा सरशी, इंग्लंड पहिल्या दिवशीच बॅकफुटवर

IND vs ENG : भारतीय स्पिनर्सची पुन्हा सरशी, इंग्लंड पहिल्या दिवशीच बॅकफुटवर

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननं पुन्हा निराशा केली आहे. भारतीय स्पिनर्सच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम पहिल्याच दिवशी ऑल आऊट झाली आहे.

    अहमदाबाद, 04 मार्च :  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननं पुन्हा निराशा केली आहे. भारतीय स्पिनर्सच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम पहिल्याच दिवशी ऑल आऊट झाली आहे. बॅटिंगला अनुकूल असलेल्या या पिचवर इंग्लंडला फक्त 205 रन करता आले भारताकडून अक्षर पटेल (Axar Patel) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं चार विकेट्स घेतल्या. आर. अश्विननं (R. Ashwin) 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. इंग्लंडचा ओपनर डॉम सिबले (Dom Sibley) याला अक्षर पटेलनं फार काळ खेळू दिलं नाही. अक्षरनं त्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर सिबलेला आऊट केलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बॉलिंगमध्ये पहिला बदल करताना अक्षरच्या हातामध्ये बॉल दिला होता. अक्षरनं कॅप्टनचा हा विश्वास सार्थ ठरवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे अक्षर पटेलचं होम ग्राऊंड आहे. या मैदानावर त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे. त्यानं यापूर्वी याच मैदानावर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. (हे वाचा-IND vs ENG: पिचला सतत नावं ठेवणाऱ्या मायकल वॉनचे अखेर डोळे उघडले, म्हणाला...) विशेष म्हणजे अक्षरनं मागच्या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या सलग तीन टेस्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम अक्षरनं केला आहे. अक्षरला सलग चार इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्यासाठी मात्र एक विकेट कमी पडली. त्यानं या इनिंगमध्ये 68 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या. England are all out for 205! Axar Patel is the pick of the bowlers with returns of 4/68.#INDvENG | https://t.co/6OuUwURcgX pic.twitter.com/UHk8tQCIp9 — ICC (@ICC) March 4, 2021 इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वात जास्त 55 रन काढले. तर त्यानंतर डॅन लॉरेन्सनं 46 काढले. जसप्रित बुमराहच्या जागी या मॅचमध्ये खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनं 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC)  गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावी लागेल किंवा ड्रॉ करावी लागेल. इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Axar patel, Cricket, India vs england, Narendra modi stadium, R ashwin, Sports, Virat kohli

    पुढील बातम्या