Home /News /sport /

पंत, साहा क्वारंटाईन; मग आता इंग्लंडमधील कॉमेंटेटर खेळण्यासाठी सज्ज! शेअर केला खास PHOTO

पंत, साहा क्वारंटाईन; मग आता इंग्लंडमधील कॉमेंटेटर खेळण्यासाठी सज्ज! शेअर केला खास PHOTO

ऋषभ पंत (Rishabh Pant) किंवा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) पहिल्या टेस्टपूर्वी फिट झाले नाहीत तर राहुलला टेस्टमध्येही विकेट किपर म्हणून मैदानात उतरावं लागेल. टीम इंडियाची ही अडचण ओळखून इंग्लंड दौऱ्यावरील कॉमेंटेटर पुढे आला आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 16 जुलै: इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडिया सध्या अडचणीत आली आहे. विकेट किपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी (Dayanand Garani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर गरानी यांच्या संपर्कात आल्यानं बॉलिंग कोच भरत अरुण, विकेट किपर वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि स्टँडबाय ओपनिंग बॅटसमन अभिमन्यू इश्वरन यांनी आयसोलेशनमध्ये जावं लागलं आहे. या परिस्थितीमध्ये 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रॅक्टीस मॅचमध्ये के.एल. राहुलला (KL Rahul) विकेट किपर म्हणून खेळवण्याचा निर्णय टीम मॅनेजनेंटनं घेतला आहे. ऋषभ पंत किंवा ऋद्धीमान साहा पहिल्या टेस्टपूर्वी फिट झाले नाहीत तर राहुलला टेस्टमध्येही विकेट किपर म्हणून मैदानात उतरावं लागेल. पण, त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे हा जुगार महाग पडू शकतो. टीम इंडियाची ही अडचण ओळखून इंग्लंड दौऱ्यावरील कॉमेंटेटर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) पुढे आला आहे. कार्तिक सध्या 'द हंड्रेड' या स्पर्धेची कॉमेंट्री करण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. पंत-साहा यांच्या अनुपस्थितीमध्ये तो विकेट किपरची जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज आहे. कार्तिकनं ट्विटरवर खास फोटो शेअर करत ही ऑफर दिली आहे. कार्तिकनं 2004 ते 2018 या काळात टीम इंडियाकडून 26 टेस्ट खेळल्या आहेत. टी20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा दिनेश कार्तिकचं आगामी टी20 खेळण्याचं लक्ष्य आहे. त्याने ही इच्छा यापूर्वी बोलून दाखवली होती. "आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमधील T20 मॅचमधील माझी आकडेवारी पाहिली तर मला 100 टक्के टीम इंडियात जागा मिळायला हवी, असा माझा विश्वास आहे. अन्य गोष्टी या निवड समितीचे सदस्य काय विचार करतात यावर अवलंबून असेल. 'या' कारणामुळे झाला ऋषभ पंतला कोरोना! वाचा Inside Story मी मिडल ऑर्डरमध्ये योगदान देऊ शकतो. भारतीय टीममध्ये अशा खेळाडूची गरज आहे.मी माझ्या खेळाचे उदाहरण यापूर्वी दिलंय. मला माझे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली संधी आहे.'' असा विश्वास कार्तिकनं व्यक्त केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rishabh pant, Sports

    पुढील बातम्या