Home /News /sport /

IND vs ENG: 'या' कारणामुळे झाला ऋषभ पंतला कोरोना! वाचा Inside Story

IND vs ENG: 'या' कारणामुळे झाला ऋषभ पंतला कोरोना! वाचा Inside Story

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC Final 2021) भारतीय टीमच्या खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टीच्या काळात खेळाडूंना कोरोनाचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. दुर्दैवानं ही भीती खरी ठरली.

    लंडन, 16 जुलै: वर्ल्ड  टेस्ट चॅम्पियनशिपनंतर (WTC Final 2021) भारतीय टीमच्या खेळाडूंना 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टीच्या काळात खेळाडूंना कोरोनाचा धोका असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. दुर्दैवानं ही भीती खरी ठरली. भारत विरुद्ध इंग्लंड मालिका (India vs England) सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांना कोरोना झाल्याचं उघड झालं. तर गरानी यांच्या संपर्कात आल्यानं बॉलिंग कोच भरत अरुण, विकेट किपर वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि स्टँडबाय ओपनिंग बॅटसमन अभिमन्यू इश्वरन यांनी आयसोलेशनमध्ये जावं लागलं आहे. कोरोना संक्रमणाचा सोर्स ट्रॅक करणे अवघड आहे. मात्र पंत दातांच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला होता त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचं मानलं जात आहे. पंत 8 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर क्वारंटाईन आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' मधील रिपोर्टनुसार पंत 5 आणि 6 जुलै रोजी डेंटिस्टकडे गेला होता. याच काळात भारतीय क्रिकेटपटू, स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना व्हॅक्सीनचा दुसरा डोस देण्यात आला. 'ऋषभ पंत 5 आणि 6 जुलै रोजी डेंटिस्टकडे उपचारासाठी गेला होता. त्यानंतर 7 जुलै रोजी त्याला लस देण्यात आली. त्याचबरोबर तो 29 जून रोजी जर्मनी विरुद्ध इंग्लंड यांची मॅच पाहण्यासाठी वेम्बले स्टेडियममध्ये देखील गेला होता,' अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऋषभ पंत ब्रेकच्या काळात हॉटेलमध्ये नव्हता. त्याला 8 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमचे पंतच्या तब्येतीवर लक्ष आहे. तो आता  बरा होत असून दोन दिवसांनी त्याचा आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो डरहॅममध्ये दाखल होईल.' विराटच्या कॅप्टनसीवर मोहम्मद कैफचा आरोप, टीम निवडीवर म्हणाला... गांगुलीने केला होता बचाव यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतचा बचाव केला होता. 'आपण इंग्लंडमधील युरो कप आणि विम्बल्डन स्पर्धेच्या दरम्यान पाहिले आहे. नियम बदलले आहेत. (प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी आहे.) तो सुट्टीवर होता आणि प्रत्येक वेळी मास्क घालणे शारीरिक दृष्ट्या शक्य नाही.' असे गांगुली यांनी स्पष्ट केले. ऋषभ पंत लवकरच बरा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket news, India vs england, Rishabh pant

    पुढील बातम्या