मुंबई,7 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आज म्हणजेच 7 जुलै रोजी 40 वर्षांचा झाला आहे. धोनीनं 7 नंबरची जर्सी घालून टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप आणि वन-डे वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याच्या नॅशनल आणि आयपीएल जर्सीचा नंबर देखील 7 आहे. धोनीचे 7 नंबरशी विशेष कनेक्शन आहे. त्याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. तो महिना आणि दिवस देखील 7 होता.
धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं 25 एप्रिल 2010 रोजी आयपीएल सिझन 3 चे विजेतेपद पटकावले. ते चेन्नईचे पहिले आयपीएल विजेतेपद होते. ज्या तारखेला धोनीनं हे विजेतेपद पटकावले त्या तारखेची बेरीज देखील सात आहे. (Sakshi Dhoni/Instagram)
धोनीच्या आयुष्यात 7 नंबरचं खूप महत्त्व आहे. त्याने एकदा एका कंपनीबरोबर 7 डिसेंबरला सकाळी 7 वाजता 7 वर्षांसीठी करार केला होता. धोनीनंच हा खुलासा केला आहे. (Sakshi Singh_r Instagram)
2018 साली धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं 7 वी आयपीएल फायनल खेळली. त्यावेळी त्यांनी विजेतेपद पटकावले होते. (फोटो-सीएसके इन्स्टाग्राम)
आपल्याला 7 नंबरची जर्सी नशिबानं मिळाली असं, धोनीनं सांगितलं आहे. तो टीममध्ये आला त्यावेळी या नंबरची जर्सी रिकामी होती. त्यावेळी त्याने हा नंबर निवडला. (Instagram/Ruturaj)