जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: टीम इंडियामध्ये होणार एक बदल, वाचा कशी असेल Playing 11

IND vs ENG: टीम इंडियामध्ये होणार एक बदल, वाचा कशी असेल Playing 11

IND vs ENG: टीम इंडियामध्ये होणार एक बदल, वाचा कशी असेल Playing 11

ओव्हलवर आजपासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England, 4th Test) दोन्ही टीम आघाडी घेण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया या टेस्टमध्ये एक बदल करण्याची (India Probable Playing 11) शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ओव्हल, 2 सप्टेंबर : लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) हेडिंग्ले टेस्टमध्ये मोठा पराभव झाला होता. पाच टेस्टची ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. आता ओव्हलवर आजपासून (गुरुवार) सुरू होणाऱ्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England, 4th Test) दोन्ही टीम आघाडी घेण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया या टेस्टमध्ये एक बदल करण्याची (India Probable Playing 11) शक्यता आहे. कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) देखील हेडिंग्ले टेस्टमधील पराभवानंतर याचे संकेत दिले होते. फास्ट बॉलर्सना सतत टेस्ट मॅचमध्ये खेळवलं तर ते दुखापतग्रस्त होतील, असं विराटनं म्हंटलं होतं. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियात इशांत शर्माच्या (Ishant Sharma) जागी आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश होण्याची शक्यता आहे. ओव्हलचं पिच स्पिन बॉलर्सला मदत करतं असा इतिहास आहे. त्यामुळे या टेस्टमध्ये रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन हे दोन स्पिनर खेळण्याची शक्यता आहे. अश्विनचा खेळवण्याचा निर्णय टॉसपूर्वी होणार असल्याचं टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण यांनी स्पष्ट केले आहे. रहाणेला संधी मिळणार? खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागेवर सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारी यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. पण टीम मॅनेजमेंटची पद्धत पाहता तसं होण्याची शक्यता कमी आहे. भारतीय टीमनं नेहमीच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तिसऱ्या टेस्टपूर्वी चेतेश्वर पुजारावरही टीका होत होती. पण त्यानं हेडिंग्लेमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 91 रन काढत टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फुटबॉलपटू अजिंक्य रहाणेसह कॅप्टन विराट कोहलीचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे. तसंच ऋषभ पंतही या सीरिजमध्ये अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडिया एकच बदल करेल असं मानलं जात आहे. टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह और मोहम्मद शमी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात