ओव्हल, 4 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये (India vs England, 4th Test) खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या सीरिजमध्ये तीनदा जारव्हो या यूट्यूबरनं मैदानात घुसखोरी केली आहे. त्यानं शुक्रवारी ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी देखील मैदानात घुसखोरी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात (Jarvo Arrested) आली आहे. त्याच्यावर यॉर्कशर काऊंटी क्लबनं आजीवन बंदी घातली आहे. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डानं अद्याप कोणताही कडक कारवाई केलेली नाही. जारव्होला लंडन पोलिसांनी अटक केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. ओव्हल टेस्टमध्ये 34 व्या ओव्हरमध्ये उमेश यादव (Umesh Yadav) बॉलिंग करत असताना तो मैदानात आला. जारव्होने बॉलिंग ऍक्शनही केली, तसंच त्याने नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) धक्काही मारला. याआधी जारव्हो लॉर्ड्स आणि लीड्स टेस्टवेळीही मैदानात घुसला होता. लीड्सवर मैदानात आल्यानंतर जारव्होवर कारवाई करण्यात आली होती. जारव्होवर लीड्सच्या मैदानात आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली आहे. लीड्स टेस्टवेळी भारतीय बॅटिंगच्या दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर जारव्हो बॅटिंगसाठी मैदानात उतरला. लीड्समध्ये हेल्मेट आणि मास्क घालून तसंच हातात बॅट घेऊन जारव्हो खेळपट्टीपर्यंत पोहोचला, तरीही सुरक्षा रक्षकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. नंतर त्याला उचलून बाहेर नेण्यात आलं. लॉर्ड्स टेस्टच्या दरम्यानही तो सुरक्षा भेदून मैदानात आला होता. Tokyo Paralympics : ऐतिहासिक! मनिष -सिंहराज जोडीचा पराक्रम, गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची केली कमाई दिग्गजांची नाराजी जारव्होच्या या घुसखोरीबद्दल दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पंजाब पोलिसांच्या समोर त्यानं असा प्रकार केला असता तर त्याला पोलिसांनी इतका मार दिला असता की घराबाहेर पडणे अशक्य झालं असतं,’ असं मत वीरेंद्र सेहवागनं व्यक्त केलं. कॉमेंटेटर हर्षा भोगलेनंही या प्रकारावर टीका केली आहे. तर वासिम जाफरनं ट्विट करत इंग्लंडमधील मैदानांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.