टोकयो, 4 सप्टेंबर : टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतानं आणखी एक गोल्ड मेडल पटकावलं आहे. यंदा शूटिंगमध्ये भारतानं गोल्डची कमाई केलीय. 19 वर्षांचा शूटर मनिष नरवाल (Manish Narwal) यानं 50 मिटर पिस्तूल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल कमाई केली. या प्रकारातील सिल्व्हर मेडलही भारताने पटकावले. सिंहराजनं हे मेडल पटकावलं. मनिष आणि सिंहराज यांच्यात गोल्ड मेडलसाठी जोरदार लढत झाली.यामध्ये अखेर मनिषनं बाजी मारली. या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे.
India strikes GOLD ! 🥇
— Anurag Thakur (@ianuragthakur) September 4, 2021
Manish Narwal what a fabulous victory!
Congratulations on also holding the World Record in this category!
• Mixed 50m Pistol SH1 Final
• score of 218.2
• New Paralympics Record.#Cheer4India #Praise4Para pic.twitter.com/SEhVxXdA3m
What a moment!@AdhanaSinghraj creates history by winning the #Silver medal in P4 Mixed 50m Pistol SH1 Final with 216.7 points.
— MyGovIndia (@mygovindia) September 4, 2021
The nation is proud of you CHAMP!!#Cheer4India #Paralympics pic.twitter.com/K52jzGxIin
भारताची सर्वोत्तम कामगिरी पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयोमध्ये नोंदवली आहे. या स्पर्धेत भारतीय टीमनं आत्तापर्यंत 3 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 5 ब्रॉन्झ असे एकूण 15 मेडल पटकावले आहेत. यापूर्वी रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड आणि 4 सिल्व्हर मेडलची कमाई केली होती.