मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी हवी किमान 'इतकी' आघाडी, वाचा ओव्हलचा इतिहास

IND vs ENG: टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी हवी किमान 'इतकी' आघाडी, वाचा ओव्हलचा इतिहास

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलवर सुरु असलेली चौथी टेस्ट (India vs England 4 th test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडची पहिली इनिंग 290 रनवर संपुष्टात आली. यजमान टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 99 रनची आघाडी केली.

  • Published by:  News18 Desk

ओव्हल, 4 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ओव्हलवर सुरु असलेली चौथी टेस्ट (India vs England 4 th test) सध्या रंगतदार अवस्थेत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडची पहिली इनिंग 290 रनवर संपुष्टात आली. यजमान टीमनं पहिल्या इनिंगमध्ये 99 रनची आघाडी केली. टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये सावध सुरुवात करत बिनबाद 43 रन केले आहेत. दुसऱ्या दिवसचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल (KL Rahul) 22 आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 20 रन काढून नाबाद होते. इंग्लंडकडं अजूनही 56 रनची आघाडी आहे.

ओव्हलवर चौथ्या इनिंगमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड करण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर आहे. 1979 साली इंग्लंड दौऱ्यात भारतीय टीमनं 8 आऊट 429 रन करत ती टेस्ट ड्रॉ केली होती. सुनील गावसकरांनी तेव्हा 221 रनची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. याशिवाय 1947 साली दक्षिण आफ्रिकेनं 7 आऊट 423 रन करत ओव्हल टेस्ट ड्रॉ केली होती.

ओव्हलच्या मैदानात इंग्लंडची टीम 263 रन करत मॅच जिंकली आहे. पण ही 1902 सालातील घटना आहे. याशिवाय इंग्लंडनं दोन वेळा चौथ्या इनिंगमध्ये 300 पेक्षा जास्त रन केले आहेत. 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडनं चौथ्या इनिंगमध्ये 6 आऊट 369 रन करत ती मॅच ड्रॉ केली होती. त्याशिवाय 1965 साली इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 आऊट 308 रन केले होते.

IND vs ENG: मैदानात सतत घुसखोरी करणारा जारव्होला अटक, बेअरस्टोला दिली होती धडक

त्यामुळे टीम इंडियाला ओव्हल टेस्ट जिंकायची असेल तर दुसऱ्या इनिंगमध्ये किमान 350 रन करावे लागतील. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या इनिंगमध्ये 250 रनचं लक्ष्य मिळेल. पाच टेस्टच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम सध्या 1-1 नं बरोबरीत आहेत. ही टेस्ट जिंकणारी टीम सीरिज हरणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे दोन्ही टीमसाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england