मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: 'या' परिस्थितीमध्ये कधीही हरली नाही टीम इंडिया! इंग्लंडसमोर कडवं आव्हान

IND vs ENG: 'या' परिस्थितीमध्ये कधीही हरली नाही टीम इंडिया! इंग्लंडसमोर कडवं आव्हान

भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथी टेस्टमध्ये (India vs England 4 th Test) चार दिवसानंतरही रंगत कायम आहे. या टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दोन्ही टीमना मॅच जिंकण्याची आशा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथी टेस्टमध्ये (India vs England 4 th Test) चार दिवसानंतरही रंगत कायम आहे. या टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दोन्ही टीमना मॅच जिंकण्याची आशा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथी टेस्टमध्ये (India vs England 4 th Test) चार दिवसानंतरही रंगत कायम आहे. या टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दोन्ही टीमना मॅच जिंकण्याची आशा आहे.

ओव्हल, 6 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथी टेस्टमध्ये (India vs England 4 th Test) चार दिवसानंतरही रंगत कायम आहे. या टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दोन्ही टीमना मॅच जिंकण्याची आशा आहे. भारतानं इंग्लंडला विजयासाठी 368 रनचं लक्ष्य दिलं आहे. भारताविरुद्ध इतकं मोठं लक्ष्य आजवर कोणत्याही टीमनं पूर्ण केलेलं नाही. तर दुसरिकडं इंग्लंडनं दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या इनिंगमध्ये 362  रनचं लक्ष्य पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या फॅन्सनाही विजयाची आशा आहे.

टीम इंडियानं 300 पेक्षा जास्त लक्ष्य दिल्यानंतर आजवर फक्त एकदा टेस्ट गमावली आहे. तो 44 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या सीरिजमध्ये भारतीय बॉलर्सनी चांगली बॉलिंग केलीय. टीम इंडियाकडं जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे चांगले चार फास्ट बॉलर्स आहेत. त्याचबरोबर स्पिनर रवींद्र जडेजा देखील पाचव्या दिवशी निर्णायक भूमिका बजावू शकतो.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर बिनबाद 77 इतका होता.  इंग्लंडला अखेरच्या दिवशी विजयासाठी 291 रनची गरज आहे. चौथ्या दिवसाअखेरीस हसीब हमीद (Haseeb Hameed) 43 रनवर आणि रोरी बर्न्स (Rory Burns) 31 रनवर खेळत आहेत. त्याआधी ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या धमाकेदार बॅटिंगमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियानं सर्वबाद 466 रन केले.

VIDEO: टॉस जिंकताच ब्राव्होनं गायलं गाणं, प्रतिस्पर्धी कॅप्टननही दिली साथ! CSK शी आहे कनेक्शन

इंग्लंडकडून क्रिस वोक्सला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर ओली रॉबिनसन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. जेम्स अंडरसन, क्रेग ओव्हरटन आणि जो रूट यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

मॅचच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) झुंजार शतक केलं तर चेतेश्वर पुजारानेही (Cheteshwar Pujara) अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा 127 रनवर तर पुजारा 61 रनवर आऊट झाला. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर एकाच ओव्हरमध्ये ओली रॉबिनसनने (Ollie Robinson) या दोन विकेट घेतल्या. या दोघांमध्ये 150 रनची पार्टनरशीप झाली. त्याआधी रोहितने केएल राहुलबरोबर (KL Rahul) 83 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.

First published:
top videos