Home /News /sport /

VIDEO: टॉस जिंकताच ब्राव्होनं गायलं गाणं, प्रतिस्पर्धी कॅप्टननही दिली साथ! CSK शी आहे कनेक्शन

VIDEO: टॉस जिंकताच ब्राव्होनं गायलं गाणं, प्रतिस्पर्धी कॅप्टननही दिली साथ! CSK शी आहे कनेक्शन

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) स्पर्धेत सध्या खेळत आहे.

    मुंबई, 6 सप्टेंबर : वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो  (Dwayne Bravo)  कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) स्पर्धेत सध्या खेळत आहे. तो सेंट किट्स अँड नेविस पेट्रियस टीमचा कॅप्टन आहे. त्यांची या स्पर्धेत सेंट लुईस टीमशी मॅच होती. फाफ ड्यू प्लेसी (Faf Du Plessis) या टीमचा कॅप्टन आहे. या मॅचमध्ये ब्राव्होनं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानं बॅटींग घेणार की बॉलिंग? असा प्रश्न कॉमेंटेटरनं त्याला विचारला. त्यावेळी ब्राव्हो गाणं गावू लागला. ''We are Chennai boys and making all the noise wherever we go.”  असे या गाण्याचे बोल होते. ब्राव्होसोबत त्याच्या जवळ उभा असलेला फाफ ड्यू प्लेसिस देखील हे गाणं गावू लागला. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ब्राव्हो आणि फाफ ड्यू प्लेसी हे दोघंही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमचे सदस्य आहेत. सध्या ते एकमेंकाचे प्रतिस्पर्धी असले तरी 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये एकत्र खेळतील. या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली मैत्री आहे. त्यांच्यातील ही केमिस्ट्री या गाण्याच्या निमित्तानं पाहयला मिळाली. परिस्थितीवर केली कष्टानं मात, शेळ्या सांभाळणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीची राज्याच्या टीममध्ये निवड सीपीएल स्पर्धेत (CPL 2021) ब्राव्होच्या टीमनं आत्तापर्यंत सात पैकी पाच मॅच जिंकल्या असून ती 10 पॉईंट्ससह नंबर 1 वर आहे. तर ड्यूप्लेसिची टीम सहापैकी चार मॅच जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमना सध्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची चांगली संधी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या