हेंडिग्ले, 24 ऑगस्ट: इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड (Mark Wood) हेडिंग्ले टेस्टमधून बाहेर पडला आहे. लॉर्ड्स टेस्टमधील चौथ्या दिवशी वूड जखमी झाला होता. या दुखापतीमधून तो बरा होईल अशी आशा इंग्लंडच्या टीम मॅनेजमेंटला होती. त्यामुळे त्याचा सुरुवातीला टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, ही दुखापत बरी न झाल्यानं तो तिसरी टेस्ट खेळणार नाही, हे सोमवारी स्पष्ट झाले. मार्क वूड इंग्लंडच्या टीमसोबतच राहणार असून मेडिकल टीम त्याची देखरेख करणार असल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) स्पष्ट केलं आहे.
मार्क वूड जखमी झाल्यानं त्याच्या जागी साकिब महमूद (Sakib Mahamood) पदार्पण करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्याचा यापूर्वी कव्हर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला होता. वेग, रिव्हर्स स्विंग आणि यॉर्करमुळे साकिबची तुलना अनेकवेळा पाकिस्तानचा दिग्गज फास्ट बॉलर वकार युनूससोबत (Waqar Younis) होते. तर तो शोएब अख्तरचा (Shaib Akhtar) फॅन आहे. लहानपणापासूनच साकिब शोएब अख्तरला त्याचा हिरो मानतो.
साकिब इंग्लंडकडून 7 वनडे आणि 9 टी-20 मॅच खेळला आहे. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 14 आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं 9 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडनं ती सीरिज 3-0 नं जिंकली. त्यामध्ये साकिबला 'मॅन ऑफ द सीरिज'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यानं 56 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 129 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडची संभाव्य टीम: रोरी बर्न्स, हसीब अहमद, डेव्हिड मलान, जो रूट (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, साकिब महमूद आणि जेम्स अँडरसन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england