लंडन, 25 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट (IND vs ENG, Leeds Test) लीड्समध्ये सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी खेळाडू आणि बोर्ड यांच्यातील वाद उघड झाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा (ECB) निर्णय हा या वादाचं मुख्य कारण आहे. इंग्लंड बोर्डानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2.1 मिलियन पाऊंड (जवळपास 21 कोटी) बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे खेळाडू नाराज आहेत. कारण इसीबीनं मागच्यावर्षी कोरोनाचे कारण देत खेळाडूंच्या वेतनात 15 टक्के कपात केली होती.
इंग्लंडच्या एका क्रिकेटपटूनं या विषयावर 'स्पोर्ट्स मेल' शी बोलताना आपण आणि टीममधील सहकारी यावर नाराज असल्याचं सांगितलं आहे. तर अन्य एका खेळाडूनं गार्डियनशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. 'बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी फक्त स्वत:चाच विचार करत आहेत. त्यांनी कधीही टीमचा विचार केला नाही. या टीममधील खेळाडू मागील 18 महिन्यांपासून सातत्यानं बायो-बबलमध्ये आहेत.'
2022 मध्ये मिळणार बोनस
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोनसची ही रक्कम ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन, संजय पटेल आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये वाटली जाईल. हा बोनस दीर्घकाली प्रोत्साहन योजनेचा (LTIP) भाग आहे. 2017 साली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्डासोबत कायम राहवं म्हणून ही योजना सुरू करण्यात आल आहे. त्याचबरोबर द हंड्रेड (100 बॉलची मॅच) स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे बक्षीस म्हणून देखील या बोनसकडं पाहिलं जात आहे.
ECB ला 167 कोटींचा तोटा
इसीबीनं मागील वर्षी कोरोनाच्या कारणामुळे 62 कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी सुट्टीवर पाठवले आहे. काऊंटी टीमच्या कर्मचाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. इसीबीनं त्यांच्या अहवालात 167 कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे.
IPL 2021: धोनीनं लगावला महाप्रचंड सिक्स, टिमसह शोधला हरवलेला बॉल, पाहा VIDEO
इंग्लंड क्रिकेटपटूंच्या वेतनातही 15 टक्के कपात करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा बोनस जाहीर झाल्यानं खेळाडूंमध्ये नाराजी पसरलीय. या विषयावर खेळाडू आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची एक फेरी झााल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England