जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : चेन्नई टेस्ट टीम इंडियाच्या मुठीत, भारत विजयापासून सात पावलं दूर

IND vs ENG : चेन्नई टेस्ट टीम इंडियाच्या मुठीत, भारत विजयापासून सात पावलं दूर

IND vs ENG : चेन्नई टेस्ट टीम इंडियाच्या मुठीत, भारत विजयापासून सात पावलं दूर

आर. अश्विनच्या (R. Ashwin) ऑल राऊंड कामगिरीमुळे चेन्नई टेस्ट टीम इंडियाच्या मुठीत आहे. इंग्लंडला विजयासाठी आणखी 429 रन करायचे आहेत. तर भारत विजयापासून फक्त 7 पावलं दूर आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 15 फेब्रुवारी : आर. अश्विनच्या (R. Ashwin) ऑल राऊंड कामगिरीमुळे चेन्नई टेस्ट टीम इंडियाच्या मुठीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 3 आऊट 53 रन केले. जो रुट (Joe Root) 2 तर डॅनियल लॉरेन्स 19 रन काढून खेळत आहेत. या टेस्टचे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. इंग्लंडला विजयासाठी आणखी 429 रन करायचे आहेत. तर भारत विजयापासून फक्त 7 पावलं दूर आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेसनं दोन तर आर. अश्विननं एक विकेट घेतली आहे.

जाहिरात

भारताला पहिलं यश डॉम सिब्लीच्या रुपानं मिळालं. अक्षर पटेलनं ही विकेट घेतली. त्यानंतर रॉरी बर्न्स आणि डॅनियल लॉरेन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 रनची पार्टरनरशिप केली अश्विनननं बर्न्सला (25) आऊट करुन ही जोडी फोडली. त्यानंतर चौथ्या नंबरला नाईट वॉचमन म्हणून जॅक लीच उतरला होता. त्याला अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर आऊट केलं. अश्विनची झुंजार सेंच्युरी त्यापूर्वी चेन्नईच्या फिरत्या पिचवर बॅटिंग कशी करायची असते हे आर. अश्विननं दाखवून दिलं आहे. आठव्या क्रमांकावर आलेल्या अश्विनने त्याच्या टेस्ट करियरमधील पाचवी सेंच्युरी झळकावली. अश्विननं अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बॅटिंग करताना 148 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 106 रन काढले. ( वाचा :  IND vs ENG : अश्विनच्या सेंच्युरीनंतर सिराजचं जबरदस्त सेलिब्रेशन Viral, पाहा VIDEO ) विराट आणि अश्विन जोडीनं सातव्या विकेटसाठी 96 रनची भागिदारी केली. विराट कोहलीने दुसऱ्या इनिंगमध्ये निर्णायक क्षणी हाफ सेंच्युरी झळकावली. विराटची ही टेस्ट क्रिकेटमधील 25 वी हाफ सेंच्युरी आहे. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीचनं प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी दोन्ही टीमसाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत सध्या इंग्लंड 1-0 अशा आघाडीवर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात