नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आयसीसीने जारी केलेल्या वन-डे क्रमवारीतील (ICC Women’s ODI Rankings) आपले पहिले स्थान गमावले. मिताली आता तिसर्या स्थानावर घसरली आहे. मात्र, भारताची प्रमुख वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami is the new No.2 bowler) गोलंदाजी क्रमवारीत दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेतील खराब कामगिरीमुळे मिताली राजला मोठा फटका बसला आहे. तिला आयसीसी वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान गमावावे लागले आहे. तिने या मालिकेत 29 च्या सरासरीने केवळ 87 धावा काढल्या असून, तिचे 738 इतके रेटिंग गुण आहेत.
🔹 Beth Mooney breaks into top 10 in batting
— ICC (@ICC) September 28, 2021
🔹 Jhulan Goswami is the new No.2 bowler
🔹 Ashleigh Gardner jumps four spots in the all-rounder rankings
All this and more as players make huge gains in the latest @MRFWorldwide ICC Women’s ODI Player Rankings 👇