मुंबई, 7 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) फायनलमध्ये इंग्लंडच्या इनिंगला खिंडार पाडणारा फास्ट बॉलर रवी कुमारचे (Ravi Kumar) वडील सीआरपीएफमध्ये आहेत. देशाला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या राजिंदर यांना त्यांच्या मुलानं क्रिकेट खेळण्यास कधी सुरूवात केली हे माहिती नाही. पण, आज त्यांच्या मुलामुळे त्यांना सर्वत्र मान मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अलिगडच्या रवीच्या वडिलांनी देशसेवेसाठी सर्व आयुष्य वेचलं आहे. राजिंदर कुमार सध्या ओडिशातील नक्षलप्रभावित रायगड जिल्ह्यातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये आहेत. ‘मी गोळी चालवून देशाची सेवा करतो. तर मुलगा बॉल टाकून देशाचं नाव मोठं करत आहे, असे त्यांनी सांगितले. राजिंदर यांनी बराच काळ जम्मू काश्मीरमध्ये देशाची सेवा केली आहे. रवी बराच लहान होता तेव्हा म्हणजे 2006 साली ग्रेनेड हल्ल्यात राजिंदर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला सांगितली नव्हती. राजिंदर यांनी 15 वर्षांनी ‘त्या’ ग्रेनेड हल्ल्याच्या आठवणी सांगितल्या आहे. ‘मी त्या हल्ल्याबाबत घरी कुणालाही कळवलं नव्हतं. मला झालेला त्रा देखील मी एकट्यानं सहन केला. माझ्या दोन्ही पायांना तसंच हातांना ग्रेनेड हल्ल्यामुळे जखमा झाल्या होत्या. तरीही मी कुणाला सांगितले नाही. त्यांना टीव्ही पाहिल्यानंतर याबाबत माहिती झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमचे दिवस फिरले! बॅट शांत, टीमही संकटात मी देशाची सेवा करण्यासाठी घराच्या बाहेरच होतो. त्यामुळे मुलाच्या क्रिकेटमधील प्रगतीबाबत मला जास्त माहिती नव्हती. मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक वर्ष होतो. तसंच मला सतत प्रवास करावा लागत असे. त्यामुळे मला त्याने क्रिकेट खेळणं कसं सुरू केलं याची फाार माहिती नाही. त्याला (रवी कुमार) क्रिकेट खेळायला आवडतं इतकंच मला माहिती होते. अरविंद भारद्वाज यांच्या क्रिकेट अकदामीमध्ये रवीनं प्रवेश घेतला आहे, हे समजल्यानंतर मला काळजी वाटली. कारण, क्रिकेटपटू म्हणून त्याला करिअर करायचं असेल तर त्याला मदत करण्यासाठी माझ्याकडं फार पैसे नव्हते. त्यानं हा प्रवास स्वबळावर केला आहे. रवीचा हा प्रवास त्याच्या खेळावरील निष्ठेचं प्रतिक आहे,’ असे राजिंदर कुमार यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.