मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 13 ऑक्टोबर रोजी होणार टीम इंडियात मोठा बदल, BCCI नं केली घोषणा

T20 World Cup: 13 ऑक्टोबर रोजी होणार टीम इंडियात मोठा बदल, BCCI नं केली घोषणा

आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) लगेच टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी (Team India) 13 ऑक्टोबरचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) लगेच टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. तब्बल 5 वर्षांनी हा वर्ल्ड कप होणार असून याचे आयोजन हे यूएई आणि ओमान या देशांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत 12 टीम विजेतेपदासाठी झुंज देतील. त्यांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक गटात 6 देशांचा समावेश आहे. या वर्ल्ड कपच्या पूर्वी पात्रता फेरी होणार असून ते सामने 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी प्रवासात  13 ऑक्टोबरचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसेल. बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. या जर्सीचा रंग कसा असेल? यामध्ये काय खास असेल याची माहिती BCCI) अद्याप जाहीर केलेली नाही.

बीसीसीआयनं पोस्ट शेअर करत म्हंटलं आहे की, 'आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत आहोत, त्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी आमच्याह सभागी व्हा. तुम्ही यासाठी उत्साहित आहात का?'

भारतीय क्रिकेट टीम गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गडद निळ्या रंगाची जर्सी घालत आहे. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये ही जर्सी वापरण्यात आली होती. इंग्लंड विरुद्धच्या सीरिजपर्यंत हीच जर्सी टीम इंडियानं वापरली. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.|

'या' 3 खेळाडूंबाबत निवड समितीनं केली चूक, T20 वर्ल्ड कपमध्ये बसणार फटका!

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: T20 world cup