Home /News /sport /

T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार

T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, वाचा कधी आहे भारत-पाकिस्तान मॅचचा थरार

ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक (ICC T20 World Cup 2022) आयसीसीने जाहीर केले आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तान (India vs Pakistan) विरुद्ध होणार आहे.

    मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक (ICC T20 World Cup 2022) आयसीसीने जाहीर केले आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची फायनल मेलबर्नमधील एमसीजी (MCG) ग्राऊंडवर होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना कधी? 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेची पात्रता फेरी खेळली जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी मुख्य फेरीतील पहिला सामना विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया आणि फायनलिस्ट न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. आयसीसी स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमधील एमसीजी स्टेडियमवर या कट्टर प्रतिस्पर्धी टीममधील मॅचचा थरार अनुभवता येणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. आता 23 ऑक्टोबर रोजी या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला असेल. कसे आहेत ग्रुप? टी20 वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत 12 टीम खेळणार आहेत. ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. तर ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या टीम आहेत. त्याचबरोबर दोन्ही ग्रुपमध्ये पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत पात्र होणाऱ्या प्रत्येकी 2 टीम सहभागी होतील. रहाणे-पुजाराचा खेळ खल्लास! टीम इंडियातून आली मोठी Update टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर, मेलबर्न भारत विरुद्ध ग्रुप A उपविजेता – 27 ऑक्टोबर, सिडनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 30 ऑक्टोबर, पर्थ भारत विरुद्ध बांगलादेश – 2 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड भारत विरुद्ध ग्रुप B विजेता – 6 नोव्हेंबर, मेलबर्न पहिली सेमी फायनल – 9 नोव्हेंबर, सिडनी दुसरी सेमी फायनल – 10 नोव्हेंबर, अ‍ॅडलेड फायनल – 13 नोव्हेंबर, मेलबर्न
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs Pakistan, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या