World test Championship च्या फायनलवर कोरोनाचं सावट, बॉलर्सना बसणार फटका!

World test Championship च्या फायनलवर कोरोनाचं सावट, बॉलर्सना बसणार फटका!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World test Championship) स्पर्धेची फायनल 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. या फायनलवर देखील कोरोना व्हायरसचं सावट आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World test Championship) स्पर्धेची फायनल 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन अव्वल टीममध्ये ही मॅच होणार आहे. या फायनलवर देखील कोरोना व्हायरसचं सावट आहे. कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने काही गोष्टींवर मागच्या वर्षी बंदी घातली होती. ही बंदी जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका बॉलर्सना बसणार आहे.

कोणत्या गोष्टींवर बंदी?

आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये त्रयस्थ अंपायर्सच्या जागी स्थानिक अंपायर्सना आयसीसीनं मागच्या वर्षी परवानगी दिली होती. अंपायर्सना एका देशामधून दुसऱ्या देशात जाण्याचा त्रास वाचावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय आयसीसीच्या कार्यकारी समितीनं घेतला आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडचेच तीन अंपायर असतील.

लाळ वापरण्यास बंदी

कोरोना संकट कायम असल्यानं बॉल चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार नाही. त्याचा सर्वात जास्त फटका बॉलर्सला बसणार आहे. खेळाडूंना घामाचा वापर करता येईल. एखादा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास सध्या असलेले नियम फायनल मॅचमध्येही लागू असतील. टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीनं नेमलेल्या समितीनं मागील वर्षी हे सर्व नियम बनवले आहेत.

(हे वाचा : IPL 2021: 'या' कारणामुळे विराट कोहलीला व्हावं लागणार आठवडाभर क्वारंटाईन! )

आयसीसी कार्यकारी समितीच्या बैठकीत सॉफ सिग्नलवर देखील चर्चा झाली. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत या निर्णयावर बराच वाद झाला होता. त्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आयसीसीकडे केली होती. यावर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सॉफ्ट सिग्नल रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

Published by: News18 Desk
First published: March 30, 2021, 10:01 AM IST

ताज्या बातम्या