मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup 2021: पाकिस्तानची टीम जाहीर, 2 सुपर फ्लॉप खेळाडूंचा समावेश

T20 World Cup 2021: पाकिस्तानची टीम जाहीर, 2 सुपर फ्लॉप खेळाडूंचा समावेश

17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) पाकिस्तानची 15 सदस्यीय टीम जाहीर झाली आहे.  या टीममध्ये यावर्षी सुपर फ्लॉप गेलेल्या दोन बॅट्समनचा समावेश करण्यात आला आहे

मुंबई, 6 सप्टेंबर : 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) पाकिस्तानची 15 सदस्यीय टीम जाहीर झाली आहे. बाबर आझम (Babar Azam) या टीमचा कॅप्टन असेल. या टीममध्ये यावर्षी सुपर फ्लॉप गेलेल्या दोन बॅट्समनचा समावेश करण्यात आला आहे. तर शोएब मलिक या अनुभवी खेळाडूकडं दुर्लक्ष करण्यात आलंय. फखर जमां, शाहनावाज दहानी आणि उस्मा कादीर यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी भारताशी होणार आहे. वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानची टीम 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध 2 टी 20 सामने खेळणार आहे. या दोन्ही सीरिजसाठी देखील हीच टीम असेल.

फ्लॉप खेळाडूंचा समावेश

टी 20 वर्ल्ड कपमध्ये असिफ अली आणि खुशदिल शाह यांचा समावेश करण्यात आला आहे. असीफ अलीचं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात टी20 टीममध्ये समावेश करण्यात आला होता. दोन वर्षांनंतर त्याला टीममध्ये संधी मिळाली होती. त्यानं यावर्षी 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यामध्ये फक्त 13 रन काढले आहेत. तर खुशदिलनं यावर्षी पाकिस्तानसाठी 2 टी 20 सामन्यांमध्ये 27 रन केले आहेत.

IND vs ENG: 'या' परिस्थितीमध्ये कधीही हरली नाही टीम इंडिया! इंग्लंडसमोर कडवं आव्हान

T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्‍मद रिजवान, आसिफ अली, खुशहिदल शाह, मोहम्‍मद हफीज, शोएब मकसूद, आजम खान, इमाद वसीम, मोहम्‍मद नवाज, मोहम्‍मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हॅरीस राऊफ, मोहम्‍मद हसनैन आणि  शाहिन अफ्रिदी.

राखीव खेळाडू : फखर जमां, उस्‍मान कादिर, शाहनवाज दानी

First published: