मुंबई, 7 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं (ICC) टी20 क्रिकेटसाठी नव्या नियमांची घोषणा केली केली आहे. याच महिन्यापासून हे नियम लागू होणार आहेत. स्लो ओव्हर रेटबाबत हा नियम आयसीसीनं जाहीर केला आहे. यानुसार एखादी टीम स्लो ओव्हर रेटनं बॉलिंग करत असेल तर उर्वरित ओव्हर्स त्यांचा एक कमी फिल्डर 30 यार्डाच्या बाहेर उभा राहील. सध्या ‘पॉवर प्ले’ नंतर 30 यार्डाच्या बाहेर 5 खेळाडू उभे राहू शकतात. मात्र नव्या नियमानुसार टीमनं चूक केली तर फक्त 4 खेळाडूच बाहेर उभे राहू शकतील. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुसार या नियमाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड या स्पर्धेत हा नियम वापरला जातो. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही हा नियम लागू करण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार फिल्डिंग करणाऱ्या टीमनं शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलपर्यंत ओव्हर रेटनुसार बॉलिंग करणे बंधनकारक आहे.
Changes to T20I Playing Conditions come into effect https://t.co/RevgbZWOAl via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) January 7, 2022
आयसीसीच्या आणखी नियमानुसार इनिंगच्या दरम्यान अडीच मिनिटांचा वैकल्पिक ड्रिंक ब्रेक घेण्याची परवानगी टीमना देण्यात आली आहे. या ब्रेकचा निर्णय दोन्ही टीमनी मालिका सुरू होण्यापूर्वी घ्यायचा आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात 16 जानेवारी रोजी होणाऱ्या टी20 सामन्यापासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत. तर महिला क्रिकेटमध्ये हे नियम 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपासून लागू होतील. 76 नाही तर 6 मॅच खेळणाऱ्या खेळाडूला संधी, निवड समितीला गप्प बसण्याचे आदेश