जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : 76 नाही तर 6 मॅच खेळणाऱ्या खेळाडूला संधी, निवड समितीला गप्प बसण्याचे आदेश

World Cup : 76 नाही तर 6 मॅच खेळणाऱ्या खेळाडूला संधी, निवड समितीला गप्प बसण्याचे आदेश

World Cup : 76 नाही तर 6 मॅच खेळणाऱ्या खेळाडूला संधी, निवड समितीला गप्प बसण्याचे आदेश

महिला वर्ल्ड कपसाठी (ICC Women World Cup 2022) टीम इंडियाची निवड झाली आहे. या टीममधून जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) आणि शिखा पांडे (Shikha Pandey) यांचा समावेश न करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जानेवारी : न्यूझीलंडमध्ये मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या महिला वर्ल्ड कपसाठी (ICC Women World Cup 2022) टीम इंडियाची निवड झाली आहे. मिताली राज (Mithali Raj) या टीमची कॅप्टन आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) व्हाईस कॅप्टन आहे. या टीममधून जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) आणि शिखा पांडे (Shikha Pandey) यांचा समावेश न करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. टीम इंडियात स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि झुलन गोस्वामी या अनुभवी खेळाडूंना संधी  देण्यात आली आहे. पण, जेमिमा आणि शिखा या अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट करण्यात आला आहे. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंना जागा का मिळाली नाह? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे निवड समितीनं या विषयावर कोणतंही ठोस कारण दिलेले नाही. 32 वर्षांच्या शिखा पांडे मागील वर्षामध्ये जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेत खेळली होती. शिखा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीम इंडियासोबत होती. पण, तिला वन-डे मलिका खेळायला मिळालेली नाही. शिखाच्या जागी हिमाचल प्रदेशची रेणूका सिंह (Renuka Singh) आणि उत्तर प्रदेशच्या मेघना सिंह (Meghna Singh) यांचा समावेश करण्यात आला आहे. रेणूकाने आजवर वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तप मेघानं 3 वन-डे खेळल्यात आहेत. तर दुसरिकडं शिखाकडं 55 वन-डे सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याचपद्धतीने 21 वन-डेचा अनुभव असणाऱ्या जेमिमाच्या जागी 3 वन-डे खेळलेल्या यास्तिका भाटियाचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ 76 वन-डे खेळण्याचा अनुभव असणाऱ्या शिखा आणि जेमिमाच्या जागी 6 वन-डे खेळणाऱ्या खेळाडूंची निवड समितीनं वर्ल्ड कप टीममध्ये निवड केली आहे. IND vs SA : द्रविड घेणार पंतची ‘शाळा’, खराब खेळाबद्दल केले मोठे वक्तव्य बोलण्याचा अधिकार नाही महिला क्रिकेट टीमच्या निवड समितीची प्रमुख नीतू डेव्हिड (Neetu David) यांनी या विषयावर मोठं वक्तव्य केले आहे. वादग्रस्त टीम निवडीवर त्यांना प्रश्न विचारला असता ‘आम्हाला या विषयावर बोलण्याची परवानगी नाही.’ असं स्पष्टीकरण डेव्हिड यांनी दिले आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाल्यास बीसीसाआयच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाते. 2020 साली महिला टी20 वर्ल्ड कपच्या निवडीनंतरही पत्रकार परिषद झाली होती. तेव्हाच्या निवड समितीच्या अध्यक्ष हेमलता यांनी त्यावेळी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिला होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात