मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग! 2 क्रिकेटपटूंवर 8 वर्षांची बंदी, भारतीय सट्टेबाजाकडून घेतले होते पैसे

क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग! 2 क्रिकेटपटूंवर 8 वर्षांची बंदी, भारतीय सट्टेबाजाकडून घेतले होते पैसे

क्रिकेट विश्वावरील काळा डाग असलेल्या मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. या प्रकरणात दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीनं आठ वर्षांची बंदी घातली आहे.

क्रिकेट विश्वावरील काळा डाग असलेल्या मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. या प्रकरणात दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीनं आठ वर्षांची बंदी घातली आहे.

क्रिकेट विश्वावरील काळा डाग असलेल्या मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. या प्रकरणात दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीनं आठ वर्षांची बंदी घातली आहे.

दुबई, 2 जुलै: क्रिकेट विश्वावरील काळा डाग असलेल्या मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं यूएईच्या दोन क्रिकेटपटूंवर  आयसीसीनं (ICC) आठ वर्षांची बंदी घातली आहे. अमिर हयात (Amir Hayat) आणि अशफाक अहमद (Ashfaq Ahmed) असं त्यांचं नाव आहे. या दोघांनी टी20 वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामने भारतीय सट्टेबाजाच्या  (Indian Bookie) मदतीने फिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानात जन्मलेल्या या दोन्ही क्रिकेटपटूंवर 13 सप्टेंबर 2020 रोजी आरोप दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी देखील त्याच दिवसापासून केली जाणार आहे.

“या दोघांनी भारतीय सट्टेबाजाकडून सामना फिक्स करण्यासाठी 15000 दिरहॅम (जवळपास 4083 डॉलर) घेतली होती. आयसीसीनं या आरोपपत्रात या सट्टेबाजाचा उल्लेख ‘मिस्टर वाय’ म्हणून केला आहे. हे प्रकरण 2019 साली घडले आहे. या दोन क्रिकेटपटूंपैकी हयात फास्ट बॉलर असून अहमद बॅट्समन आहे.

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमावलीनुसार या दोघांवर पाच आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये भ्रष्टाचारी व्यक्तींनी संपर्क साधल्यावर याची माहिती न देणे, अनैतिक पद्धतीनं सामन्यांचा निकाल प्रभावित करणे, 750 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची भेट स्विकारणे या आरोपांचा समावेश आहे. हयात आणि अहमद आयसीसीच्या तीन भ्रष्टाचार विरोधी शैक्षणिक सत्रात सहभागी झाले होते, याचा उल्लेख देखील या निकालामध्ये करण्यात आला आहे.

‘राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच, शास्त्रीच्या जागेचा प्रबळ दावेदार’

हे दोन्ही खेळाडू भारतीय सट्टेबाजाशी व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते, पण ठरलेल्या तारखेला त्यांची भेट झाली नाही, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Match Fixing