मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! भारतीय क्रिकेट टीमच्या या कॅप्टनला कोरोनाची लागण

धक्कादायक! भारतीय क्रिकेट टीमच्या या कॅप्टनला कोरोनाची लागण

 दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरुच आहे. आता भारतीय महिला टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 मार्च : दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरुच आहे. सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, यूसूफ पठाण आणि एस. बद्रीनाथ या चार खेळाडूंना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्यानंतर भारतीय महिला टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हरमनप्रीतला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाचव्या वन-डे च्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर ती टी20 मालिका खेळू शकली नव्हती. सोमवारी झालेल्या चाचणीमध्ये हरमनप्रीतची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

हरमनप्रीत चार दिवसांपासून आजारी होती.  कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच तिनं स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. तिच्यावर योग्य उपचार सुरु असून लवकरच ती पूर्ण बरी होईल अशी माहिती तिच्या जवळच्या सूत्रांनी PTI ला दिली आहे.

हरमनप्रीत कौरची भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या दरम्यान नियमित कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही मालिका संपल्यानंतरच तिला कोरोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेच्या वन-डे आणि टी-20 मालिकेत भारताचा पराभव झाला. पण या मालिकेत हरमनप्रीतनं एक अर्धशतक झळकावले होते.

आयपीएलवरही कोरोनाचे संकट

भारत आणि इंग्लंड सीरिजमध्ये (India vs England) कॉमेंट्री करणाऱ्या इरफान पठाणला (Irfan Pathan) कोरोनाची लागण झाली आहे. रायपूरमध्ये झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) इरफान पठाण खेळला होता.

(हे वाचा :  World test Championship च्या फायनलवर कोरोनाचं सावट, बॉलर्सना बसणार फटका!)

इराफान पठाणने भारत-इंग्लंड मालिकेच्या दरम्यान स्टार स्पोर्ट्सवर एक कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम करताना इरफान पठाण अजून कुणाच्या संपर्कात आला, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांचा यात समावेश आहे का? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण इरफान जर यांच्या व्यतिरिक्त कोणाच्या संपर्कात आला असेल तर आयपीएलवरचं संकट वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Covid-19, Cricket, India vs england, Indian women's team, ROAD SAFETY CAMPAIGN, Sports