मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Sagar Dhankar Murder: सुशील कुमार जेलमध्ये अर्धपोटी, विशेष खुराकची मागणी

Sagar Dhankar Murder: सुशील कुमार जेलमध्ये अर्धपोटी, विशेष खुराकची मागणी

'सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार पुरेसा नाही. आपल्या डाएटचा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त खाणे द्यावे, अशी सुशीलची (Sushil Kumar) मागणी आहे.

'सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार पुरेसा नाही. आपल्या डाएटचा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त खाणे द्यावे, अशी सुशीलची (Sushil Kumar) मागणी आहे.

'सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार पुरेसा नाही. आपल्या डाएटचा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त खाणे द्यावे, अशी सुशीलची (Sushil Kumar) मागणी आहे.

नवी दिल्ली, 7 जून: दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) झालेल्या कुस्तीपटू  सागर धनखड (Sagar Dhankar) हत्या प्रकरणात ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार (Sushil Kumar) याला अटक झाली आहे. सुशील सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये (judicial custody) आहे. जेलममध्ये आपण अर्धपोटी राहत असल्याची तक्रार सुशील कुमारने केली आहे.

याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, 'सामान्य कैद्यांना दिला जाणारा आहार पुरेसा नाही. आपल्या डाएटचा विचार करुन जेल प्रशासनाने प्रोटीन युक्त खाणे द्यावे, अशी सुशीलची मागणी आहे. आपण एक कुस्तीपटू असून त्यामुळे आपल्यासाठी सामान्य व्यक्तींना दिले जाणारे जेवण पुरेसे नाही. त्यासाठी प्रोटीनयुक्त विशेष खुराक आवश्यक आहे, असं सुशीलचं मत आहे. तो याबाबत कोर्टातही अर्ज करण्याची शक्यता आहे.'

तपासात सुशीलचा असहकार

यापूर्वी सुशील कुमार प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना कोर्टाने धक्का दिला होता. कोर्टाने सुशीलची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी फेटाळली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाच्या दरम्यान एक महत्त्वाचा व्हिडीओ (Video) हाती लागल्याचा दावा केला आहे. आरोपी सुशीलला हरिद्धवारला नेऊन या प्रकरणातील आणखी काही लोकांना अटक करायचं असल्याचा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला. त्याचबरोबर सुशील तपासात कोणतीही मदत करत नसल्याची तक्रार पोलिसांनी कोर्टात केली.

या प्रकरणात तब्बल दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला 23 मे रोजी अटक करण्यात आली  होती. सुशील पोलीस कोठडीमध्ये असताना त्याच्या चौकशीत कोणताही ठोस पुरावा दिल्ली पोलिसांना मिळालेला नाही. या प्रकरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचनी या हत्येचा कोणताही ठोस निष्कर्ष अद्याप काढलेला नाही.

बोको हरामचा दहशतवादी शेकऊची आत्महत्या, 300 शाळकरी मुलींच्या अपहरणामुळे होता चर्चेत

सागर धनकरच्या हत्येला एक महिना झाल्यानंतरही  या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. सागरला मारहाण करताना सुशील कुमारनं घातलेले कपडे किंवा ती काठी अजूनही हस्तगत झालेली नाही. त्याचबरोबर ज्या कारमधून सुशील कुमारने फरार असताना प्रवास केला ती कार जप्त करण्यात देखील दिल्ली पोलिसांना अपयश आले आहे.

First published:

Tags: Crime news, Wrestler