मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday Ganguly: क्रिकेट नाही तर ‘या’ खेळात करायचे होते गांगुलीला करियर, वाचा कसा बनला आक्रमक बॅट्समन

Happy Birthday Ganguly: क्रिकेट नाही तर ‘या’ खेळात करायचे होते गांगुलीला करियर, वाचा कसा बनला आक्रमक बॅट्समन

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज 49 वर्षांचा झाला आहे. वन-डे क्रिकेटमधील आक्रमक ओपनर आणि टीम इंडियाला बदलणारा कॅप्टन अशी गांगुलीची ओळख आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 जुलै : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज 49 वर्षांचा झाला आहे. वन-डे क्रिकेटमधील आक्रमक ओपनर आणि टीम इंडियाला बदलणारा कॅप्टन अशी गांगुलीची ओळख आहे. विशेष बाब म्हणजे त्याला सुरुवातीला क्रिकेटर नाही तर फुटबॉलपटू व्हायचं होतं. मात्र योगायोगानं तो क्रिकेटर बनला. गांगुलीनं एका मुलाखतीमध्येच ही माहिती दिली होती.

गांगुलीला क्रिकेटपटू बनवण्यात त्याचे वडील चंडीदास गांगुली यांचे योगदान होते. ते तेव्हा पश्चिम बंगाल क्रिकेट बोर्डाचे सदस्य होते. “फुटबॉल हेच माझं आयुष्य होतं. मी 9 वी पर्यंत या खेळात चांगला होतो. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडिलांनी मला क्रिकेट अकादमीमध्ये टाकले. त्यानंतर मी हळू हळू फुटबॉलपासून दूर गेलो,’ अशी माहिती गांगुलीनं दिली आहे.

कसा बनला ओपनिंग बॅट्समन?

गांगुलीनं वयाच्या 19 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये तो फक्त 3 रन काढून आऊट झाला. त्यानंतर चार वर्ष त्याला टीम इंडियाच्या बाहेर बसावं लागलं. अखेर 1996 साली त्याचे टीममध्ये पुनरागमन झाले. इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन टेस्टमध्येच त्याने शतक झळकावले.

गांगुली तेव्हा मिडल ऑर्डरमध्ये बॅटींग करत असे. त्याला ओपनिंग बॅट्समन करण्यात तेव्हाचे प्रशिक्षक मदनलाल यांचा वाटा होता. ‘आम्हाला दादामधील गुणवत्तेचा फायदा घ्यायचा होता. मी त्याला सांगितले की, तू 5 क्रमांकावर खेळलास तर तुझा फार फायदा होणार नाही. तुला ओपनिंग करावी लागेल. त्यानंतर गांगुली ओपनिंग बॅट्समन बनला आणि त्याने नंतर मागे वळून पाहिले नाही. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या ओपनिंग जोडीनं इतिहास रचला.’ अशी आठवण मदनलाल यांनी सांगितली आहे.

धोनीच्या वाढदिवशी गंभीरने शेयर केलेल्या PHOTO वरून वाद, चाहते संतापले

बीसीसीआयच्या सध्याच्या अध्यक्षांनी त्यांच्या करियरमध्ये 113 टेस्ट आणि 111 वन-डे मॅच खेळल्या. त्याने टेस्टमध्ये 35 अर्धशतक आणि 16 शतकांसह 7212 रन केले. तर वन-डे क्रिकेटमध्ये 72 अर्धशतक आणि 22 शतकांसह 11362 रन काढले. त्याचबरोबर गांगुलीनं टेस्टमध्ये 32 तर वन-डेमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत.

First published:

Tags: Cricket news, On this Day, Sourav ganguly