मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धोनीच्या वाढदिवशी गंभीरने शेयर केलेल्या PHOTO वरून वाद, चाहते संतापले

धोनीच्या वाढदिवशी गंभीरने शेयर केलेल्या PHOTO वरून वाद, चाहते संतापले

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातून चाहते आणि क्रिकेटपटू धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण धोनीच्या वाढदिवसाला भारताचा माजी ओपनर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 7 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातून चाहते आणि क्रिकेटपटू धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण धोनीच्या वाढदिवसाला भारताचा माजी ओपनर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. गंभीरने धोनीच्या वाढदिवशीच फेसबूकवर आपला कव्हर फोटो बदलला आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

गंभीरने बुधवारी फेसबूकवर आपला कव्हर फोटो म्हणून 2011 वर्ल्ड कप (2011 World Cup) फायनलचा फोटो ठेवला. या फोटोमध्ये गंभीर स्वत:ची बॅट दाखवत आहे. डावखुरा बॅट्समन असलेल्या गंभीरने 2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये 97 रनची खेळी केली होती. 2011 वर्ल्ड कप जिंकवण्यात धोनीशिवाय आपलंही योगदान आहे, असं गंभीरला सुचवायचं आहे, असं चाहत्यांना वाटलं.

एका चाहत्याने तर गंभीरने केलेली ही कृती लाजीरवाणी असल्याची टीकाही केली. 'धोनीची सगळ्यात मोठी खासीयत हीच आहे, की तो शांत राहतो. निवृत्तीनंतरही तो अशा लोकांकडे लक्ष देत नाही, जे त्याच्याविरुद्ध काम करत आहेत,' असं एक चाहता म्हणाला.

धोनी आणि गौतम गंभीर यांच्यात 36 चा आकडा असल्याचंही बोललं जातं. गंभीरनेही अनेकवेळा 2011 वर्ल्ड कपचा विजय फक्त धोनीमुळे मिळाला नाही, असं अनेकवेळा सांगितलं आहे. चाहते आणि मीडिया 2011 वर्ल्ड कप विजयाचं श्रेय धोनीची 91 रनची खेळी आणि त्याच्या अखेरच्या सिक्सला देतात. पण याच सामन्यात गौतम गंभीरने 97 रनची महत्त्वाची खेळी केली होती. वर्ल्ड कप विजयात युवराज, झहीरसह संपूर्ण टीमचा हात होता, फक्त धोनीचा नाही, असं वक्तव्य गंभीरने एका मुलाखतीत केलं होतं.

गौतम गंभीरने धोनीच्या नेतृत्वावरही अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले होते. धोनीला चांगली टीम वारसाने मिळाली होती, त्यामुळे त्याच्यासाठी नेतृत्व करणं सोपं होतं. सौरव गांगुलीने टीम इंडियाला उभं केलं होतं, असंही गंभीर म्हणाला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Gautam gambhir, MS Dhoni