मुंबई, 14 ऑगस्ट : भारताच्या अंडर-19 टीमचा माजी कर्णधार उनमुक्त चंद (Unmukt Chand) याने अमेरिकेतील माइनर लीग क्रिकेट (MLC) मधील सिलिकॉन व्हॅली स्ट्राईकर्स या टीमसोबत करार केला आहे. त्याने शुक्रवारीच सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो शनिवारी टोयोटाध्ये अमेरिकन लीगमध्ये पदार्पण करणार आहे. या लीगच्या वेबसाईटनुसार उनमुक्त चंदनं लीग क्रिकेट खेळण्यासाठी करार केला आहे. त्याचबरोबर तो अमेरिकेतील भावी क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहे.
उनमुक्त चंदनंही या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की, ' अमेरिका क्रिकेटमधील दीर्घकालीन प्रगतीचा भाग म्हणून क्रिकेट करिअरमधील नवे पाऊल टाकण्यासाठी मी उत्सुक आहे. या विकेंडला मी माइनर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी उत्साहित आहे.'
उनमुक्त चंदने भारताला 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवला. कर्णधार असलेल्या उनमुक्तने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकत टीमला चॅम्पियन बनवलं होतं. यानंतर त्याची तुलना विराट कोहलीशी (Virat Kohli) होऊ लागली, कारण विराटही अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीममध्ये दाखल झाला होता.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मात्र त्याच्या करियरला उतरती कळा लागली. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्येही (IPL) उनमुक्तची कामगिरी निराशाजनक झाली. उनमुक्त चंदने शुक्रवारी ट्वीट करून चाहत्यांना आपल्या निवृत्तीची माहिती दिली. याचसोबत त्याने आपल्या क्रिकेटच्या मैदानावरच्या आठवणींचा व्हिडिओदेखील शेयर केला होता.
Tokyo Olympics : मेडलविजेत्या खेळाडूंना सर्वात जास्त कशाची भीती वाटते? पाहा VIDEO
उनमुक्त चंदने 67 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 31.57 च्या सरासरीने 3,379 रन केले, यात 8 शतकांचा समावेश होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये उनमुक्त चंदने 41.33 च्या सरासरीने 4,505 रन केले, ज्यात 7 शतकं होती. टी-20 क्रिकेटमध्येही त्याने 3 शतकं केली, पण त्याची सरासरी फक्त 22.35 एवढी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news