नवी दिल्ली, 10 मे: क्रिकेट विश्वात बस्तान बसवण्यासाठी अमेरिकेनं जोरदार तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून त्यांनी आता विदेशी खेळाडूंना आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पाकिस्तानचा माजी ओपनिंग बॅट्समन सामी अस्लम (Sami Aslam) यापूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्यानं काही भारतीय खेळाडू आपल्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. 30 ते 40 विदेशी खेळाडू अमेरिकेत आले होते. यामध्ये भारताचा अंडर-19 विजेता कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याचाही समावेश आहे, असा दावा अस्लमनं केला आहे. अस्लमचा हा खळबळजनक दावा उन्मुक्त चंदनं फेटाळला आहे. " मी अमेरिकेत नातेवाईकांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी फक्त सरावासाठी तिथं गेलो होतो. अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी करार करण्याचा माझा कोणाताही विचार नाही." असं स्पष्टीकरण त्यानं ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना दिलं आहे. उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखालीच भारतानं 2012 साली अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला होता. BCCI ची परवानगी नाही बीसीसीआयच्या (BCCI) नियमानुसार कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला निवृत्तीची घोषणा होण्यापूर्वी विदेशात टी 20 लीग खेळण्याची परवानगी नाही. यापूर्वी युवराज सिंहला (Yuvraj Singh) विदेशातील टी 20 लीग खेळाण्यासाठी निवृत्त व्हावं लागलं. तर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने द हंड्रेड (The Hundred) या ड्राफ्टमधून माघार घेतली आहे. भावानंतर वडिलांचंही झालं निधन, ‘या’ तरुण खेळाडूला राजस्थान रॉयल्स करणार मदत काय होता दावा? सामी अस्लमनं पाकिस्तानच्या एका वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं अनेक विदेशी खेळाडू अमेरिकेत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा केला होता. " नुकतेच 30 ते 40 विदेशी खेळाडू अमेरिकेत आले होते. ज्यामध्ये भारतामधील उन्मुक्त चंद, समित पाटील आणि हरमीत सिंह या स्टार्स खेळाडूंचा समावेश होता. इथं दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू आहे. त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव आहे." असे सामीनं सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







