जयपूर, 10 मे: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित करावी लागली. बहुतेक खेळाडू आता घरी परतले आहेत. राजस्थान रॉयल्चा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) याच्या वडिलांचे कोरोनामुळे रविवारी निधन झालं. वडिलांच्या उपचारासाठी आयपीएलची सर्व कमाई देण्याची सकारियाची तयारी होती. दुर्दैवानं त्याचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या अडचणीच्या प्रसंगात सकारियाला सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन राजस्थान रॉयल्सनं दिलं आहे. भावाचंही झालं निधन आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमध्ये 7 विकेट्स घेणारा सकारियाच्या भावाचं जानेवारी महिन्यात निधन झालं झालं. तेंव्हा तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. मागच्याच आठवड्यात भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हिनं कोरोनामुळे बहिणीला गमावलं. वेदाच्या आईचं देखील कोरोनामुळे निधन झालं आहे.
It pains us so much to confirm that Mr Kanjibhai Sakariya lost his battle with Covid-19 earlier today.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 9, 2021
We're in touch with Chetan and will provide all possible support to him and his family in this difficult time.
सकारिया यानं तीन दिवसांपूर्वी वडिलांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. राजस्थान रॉयल्सकडून मला काही दिवसांपूर्वीच पैसे मिळाले आहेत, हे माझं भाग्य आहे. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये याचा उपयोग होईल." त्यांच्या उपचारासाठी IPL ची सर्व कमाई खर्च करण्याची सकारियाची तयारी होती. “मी माझ्या वडिलांच्या चांगल्या उपचारासाठी क्रिकेट आणि IPL मधून मिळालेले पैसे देत आहे. ही स्पर्धा 1 महिना झाली नसती तर माझ्यासाठी खूप अवघड परिस्थिती होती. मी गरीब कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेंपो चालवला आहे. IPL मुळेच आमचं आयुष्य बदललं आहे,” असं त्यानं सांगितलं होतं. BCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंतच्या सकारियाच्या प्रवासात अनेक अडथळे आले. 22 वर्षांचा डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या सकारियाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील टेम्पो ड्रायव्हरची नोकरी करत होते. घरात आर्थिक चणचण असताना क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्यच नव्हतं, म्हणून त्याने बूक स्टॉलवर दोन वर्ष रोजंदारीवर काम केलं. सकारियाचा आयडल युवराज सिंग (Yuvraj Singh) 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देत होता, पण हा इतिहास बघण्यासाठी त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता.

)







