मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रवी शास्त्रींनी - रणवीरसोबतचा Dance Video शेअर करत केले नववर्षाचे स्वागत

रवी शास्त्रींनी - रणवीरसोबतचा Dance Video शेअर करत केले नववर्षाचे स्वागत

टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2022 चे स्वागत त्यांच्या खास पद्धतीने केले आहे. शास्त्री यांनी अभिनेता रणवीर सिंहसोबतचा (Ranveer Singh) एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई, 1 जानेवारी : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2022 चे स्वागत त्यांच्या खास पद्धतीने केले आहे. शास्त्री यांनी अभिनेता रणवीर सिंहसोबतचा (Ranveer Singh) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये शास्त्री रणवीरसोबत डान्स करताना दिसत आहे.

शास्त्रींनी हा व्हिडीओ शेअर करत आपल्याला डान्स टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहे. 2022 याच पद्धतीनं असावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 'रणवीर सिंह डान्स स्टेप्ससाठी धन्यवाद. तुम्हाला सर्वांना 2022 चांगले आणि निरोगी जावो.' अशा शुभेच्छा शास्त्रींनी दिल्या आहेत.

शास्त्रींनी शेअर केलेला व्हिडीओ 83 या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर नाईटचा आहे. त्यावेळी या दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. टीम इंडियानं 1983 साली क्रिकेट वर्ल्ड कप (1983 World Cup) जिंकला होता. त्या यशाची ही गोष्ट आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यापूर्वी 1983 वर्ल्ड कपमधील सर्व खेळाडूंसाठी खास प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते.

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेत केले नववर्षाचे स्वागत, Photo शेअर करत विराट म्हणाला...

टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रवी शास्त्री यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा या पदासाठी अर्ज केला नाही. शास्त्री आता लिंजेंड्स क्रिकेट लीगसोबत नवी इनिंग सुरू करणार आहेत.

First published:

Tags: New year, Ranveer sigh, Ravi shashtri, Video viral