मुंबई, 24 डिसेंबर : बांगलादेशचा दिग्गज ऑल राऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्याने 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेली 15 वर्ष साततत्याने क्रिकेट खेळून थकल्याचं कारण त्याने दिले असून पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2022) इंटरनॅशनल टी20 मधून निवृत्त होण्याचे संकेत त्याने दिले आहेत. शाकिबनं एका बांगलादेशी चॅनेलशी बोलताना सांगितले की, ‘कोणत्या फॉर्मेटला महत्त्व द्यायचे हे मला माहिती आहे. मला टेस्ट क्रिकेटबाबत विचार करण्याची गरज आहे, हे वास्तव आहे. त्याचबरोबर वन-डे क्रिकेटमध्ये खेळण्याचाही निर्णय घ्यावा लागेल. मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असं नाही. कदाचित 2022 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर मी टी20 इंटरनॅशनल खेळणे बंद करेल. मी आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर टेस्ट आणि वन-डे क्रिकेट खेळेल. पण, तीन्ही फॉर्मेटमध्ये खेळणे जवळपास अशक्य आहे. 40-42 दिवसांमध्ये 2 टेस्ट खेळणे फायदेशीर नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत (BCB) बसून मला याबाबत योजना तयार करावी लागेल. तेच योग्य ठरेल. हे काम जानेवारी महिन्यात झाले, तर वर्षभर काय करायचं आहे, हे मला समजेल.’ असे शाकिबने स्पष्ट केले. बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शाकीबने या दौऱ्यातून माघार घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. शाकिबने यापूर्वी देखील निवृत्तीचा इशारा दिला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सीरिजपूर्वी त्याने हा इशारा दिला होता. विराट कोहली - BCCI वादात शास्त्रींची एन्ट्री, गांगुलीला दिला महत्त्वाचा सल्ला ‘मी आता सातत्याने क्रिकेट खेळू शकत नाही. माझे कोच आणि फिजिओशी याबाबत चर्चा करणार आहे. यावेळी मी कोणत्याही एका फॉर्मेटमधून निवृत्त होण्याबाबत विचार करत नाही, पण, मला कदाचित भविष्यात कठोर निर्णय घ्यावा लागेल. गेल्या काही वर्षात दुखापतीमुळे माझे करिअर प्रभावित झाले आहे. असं असंल तरी माझी खेळण्याबद्दलची कमिटमेंट कमी झालेली नाही.’ असे शाकिबने सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.