लाहोर, 29 मे : पाकिस्तान माजी कॅप्टन वासिम अक्रम (Wasim Akram) याने पाकिस्तान क्रिकेट टीमचा कोच (Pakistan Cricket Team) न होण्याचे कारण अखेर उघड केले आहे. या कामासाठी 200 ते 250 दिवस देशाच्या बाहेर राहावे लागते, मी इतके दिवस पाकिस्तानच्या बाहेर राहू शकत नाही. त्यामुळे या कामासाठी फिट नाही, असे अक्रमने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्याने टीमचा कोच न होण्याचे आणखी एक कारण सांगितले आहे.
अक्रमने क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीमचा कोच न होण्याचे कारण दिले आहे. "देशातील नागरिक तसेच क्रिकेट फॅन्सचा कोचला वाईट वागणूक देतात. ते टीमच्या खराब प्रदर्शनासाठी कोचलाच जबाबदार धरतात. मी मूर्ख नाही. काही खेळाडू कोचशी कसा व्यवहार करतात, हे मी सोशल मीडियावर पाहतो.'' असे अक्रमने स्पष्ट केले.
"कोचचे काम हे योजना तयार करणे आहे. टीम हरली तर त्याची एकटयाची चूक असू शकत नाही. त्यामुळे किमान मी तरी कोचबद्दल वाईट बोललेलं सहन करु शकत नाही. मला या गोष्टीची भीती वाटते. माझं लोकांवर प्रेम आहे. त्यांचा खेळाबद्दलचा उत्साह मला आवडतो. पण त्यांचा गैरव्यवहार नाही.'' असे अक्रमने यावेळी सांगितले.
खेळाडूंना मदतीसाठी तयार
पाकिस्तानच्या खेळाडूंना मदत करण्यासाठी कायम सज्ज असल्याचं अक्रमने सांगितले आहे. 'पाकिस्तान सुपर लीग असो अथवा आयसीसीसीची स्पर्धा कोणत्याही वेळी एखाद्या खेळाडूने मला मदत मागितली तर मी त्याला मदत करण्यासाठी तयार आहे,' असे अक्रमने सांगितले.
T20 वर्ल्ड कप आणि IPL 2021 बाबत होणार मोठा निर्णय, BCCI ची महत्त्वाची बैठक
वासिम अक्रम 992 साली वर्ल्ड कप विजेतेपद पटकावलेल्या टीमचा अक्रम सदस्य होता. त्याने इम्रान खान यांच्यानंतर सर्वात जास्त 109 वन-डे मॅचमध्ये पाकिस्तान टीमचे नेतृत्त्व केले. यामध्ये 66 मॅचमध्ये टीमने विजय मिळवला, तर 41 मॅचमध्ये पराभव झाला आहे. 1
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan