लंडन, 13 जून: न्यूझीलंडनं दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (New Zealand vs England) 8 विकेट्सनं सहज पराभव केला. याबरोबरच न्यूझीलंड टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली. सीरिजची पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. न्यूझीलंडनं 1999 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
इंग्लंडच्या या निराशाजनक कामगिरमुळे त्यांचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) नाराज झाला आहे. या बॅटींग ऑर्डरसह यावर्षी होणाऱ्या अॅशेस सीरिजमध्ये उतरणे अशक्य असल्याची टीका त्याने केली आहे.
दुसऱ्या टेस्टमध्ये या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये 303 रन केले. रोरी बर्न्स आणि लॉरेन्स यांनी प्रत्येकी 81-81 रनची खेळी केली. पहिल्या इनिंगमध्ये बोल्टला सर्वाधिक 4 विकेट घेता आल्या, तर मॅट हेन्रीला 3, एझाज पटेलला 2 आणि नील वॅगनरला एक विकेट घेता आली.
इंग्लंडची बॅटींग दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी गडगडली. त्यांची संपूर्ण टीम 122 रनवरच ऑल आऊट झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या फक्त दोन बॅट्समननी 20 पेक्षा जास्त रन केले.
टीम इंडिया विरुद्ध खेळ बिघडला
मायकल वॉनने बीबीसीवरील एका कार्यक्रमात बोलताना इंग्लंडचा खेळ टीम इंडिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये बिघड़ला अशी टीका केली. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडची टीममध्ये बरेच प्रयोग झाले. त्यामुळे आपल्यासाठी प्रतिकुल गोष्टी घडल्या.” असा दावा वॉनने केला आहे.
'टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही', टीम इंडियाच्या खेळाडूनं केलं जाहीर
“इंग्लंडला अॅशेस सीरिजपूर्वी चुका सुधारण्यासाठी पाच संधी आहेत. या प्रकराच्या कमकुवत बॅटींग ऑर्डरसह टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकत नाही. आपल्याला चांगल्या खेळाडूंची निवड करायला हवी,” असे वॉनने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England, New zealand