मुंबई, 9 जून: इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचे वादग्रस्त ट्विट्सचे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. भारतीयांची थट्टा करणे आणि त्यांच्यावर वर्णद्वेषी टीप्पणी केल्याप्रकरणी इंग्लंडचे दोन प्रमुख खेळाडू अडचणीत आले आहेत. इंग्लडचा मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि प्रमुख खेळाडू जोस बटलर (Joss Buttler) या दोन खेळाडूंचे जुने ट्विट्स व्हायरल (Viral) झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ECB नं घेतला आहे. इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. रॉबिन्सन पाठोपाठ आता अनेक दिग्गज खेळाडूंचे वादग्रस्त ट्विट्स समोर येत आहेत. या खेळाडूंची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) सुरू केली आहे
मॉर्गन सध्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या आयपीएल टीमचा कॅप्टन असून बटलर राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा सदस्य आहे. त्यांनी भारतीयांची थट्टा करताना 'सर' या शब्दाचा वापर केला आहे. 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने या प्रकरणात बटलरच्या ट्विटचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे.
बटलरने या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, " सर, मी तुम्हाला नेहमी उत्तर देतो. तुमच्या आणि माझ्यासारखे कुणीही नाही.'' त्याच्या या ट्विटलला मॉर्गनने उत्तर दिलं असून त्यामध्ये त्याने बटलरला टॅग केले आहे. 'सर, तुम्ही ओपनिंगला खूप चांगली बॅटींग केली' असे ट्विट मॉर्गननं केले आहे. हे ट्विट्स 2018 सालातील असून त्यावेळी बटलर आणि मॉर्गन दोघेही इंग्लंडच्या टीममध्ये प्रस्थापित झाले होते.
अँडरसन अडचणीत
इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याचे 11 वर्षांपूर्वीचे एक ट्विट आता व्हायरल (Tweet Viral) झाले असून त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.इंग्लंडचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर असलेल्या अँडरसननं हे ट्विट फेब्रुवारी 2010 मध्ये केले होते, असे सांगितले जात आहेत. यामध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) लेस्बियन व्यक्तीसारखी हेअरकट केली आहे, असे म्हंटले होते. "मी आज ब्रॉडीचा नवा हेअरकट पाहिला. मला याबाबत खात्री नाही, पण तो 15 वर्षांच्या लेस्बियनसारखा वाटत आहे.' असे ट्विट अँडरसनने केले होते.
'इंग्लंडमध्ये वर्णद्वेष सहन केला', टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितला धक्कादायक अनुभव
रॉबिन्सन प्रकरणानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, या प्रकरणाची चौकशी देखील करणार असल्याची घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, Racism, Social media