मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ENG vs PAK : T20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडचा इशारा! श्रीलंकेनंतर पाकिस्तानचा केला पराभव

ENG vs PAK : T20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडचा इशारा! श्रीलंकेनंतर पाकिस्तानचा केला पराभव

इंग्लंडनं यापूर्वी श्रीलंकेचाही टी20 मालिकेत पराभव केला होता. त्यापाठोपाठ पाकिस्तानचाही पराभव करत आगामी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) सर्व टीमना गंभीर इशारा दिला आहे.

इंग्लंडनं यापूर्वी श्रीलंकेचाही टी20 मालिकेत पराभव केला होता. त्यापाठोपाठ पाकिस्तानचाही पराभव करत आगामी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) सर्व टीमना गंभीर इशारा दिला आहे.

इंग्लंडनं यापूर्वी श्रीलंकेचाही टी20 मालिकेत पराभव केला होता. त्यापाठोपाठ पाकिस्तानचाही पराभव करत आगामी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) सर्व टीमना गंभीर इशारा दिला आहे.

लंडन, 21 जुलै : आदिल राशिदची  (Adil Rashid) भेदक बॉलिंग आणि जेसन रॉयची (Jason roy) आक्रमक बॅटींग यांच्या जोरावर इंग्लंडनं तिसऱ्या आणि निर्णायक टी20 मध्ये पाकिस्तानचा 3 विकेट्सनं पराभव केला आहे. या विजयाबरोबरच इंग्लंडनं 3 सामन्यांची ही मालिका 2-1 या फरकानं जिंकली आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्ताननं जिंकला होता. त्यानंतरचे दोन्ही सामने जिंकत इंग्लडने मालिका जिंकली. इंग्लंडनं यापूर्वी श्रीलंकेचाही टी20 मालिकेत पराभव केला होता. त्यापाठोपाठ पाकिस्तानचाही पराभव करत आगामी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) सर्व टीमना गंभीर इशारा दिला आहे.

पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत 6 आऊट 154 रन काढले होते. मोहम्मद रिझवाननं सर्वात जास्त 76 रन काढले. इंग्लंडकडून जेसन रॉयनं 64 तर डेव्हिड मलाननं 31 रन काढले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं 2 बॉल राखत थराराक विजय मिळवला.

दोन्ही टीममध्ये रंगतदार लढत

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही टीममध्ये रंगतदार लढत झाली. पाकिस्ताननं सुरूवात चांगली केली होती. मात्र त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं एक बाजू लावून धरत 57 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 76 रन काढले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. इंग्लंडकडून आदिल राशिद सर्वात यशस्वी ठरला. त्याने 35 रन देत 4 विकेट्स घेतल्या.

155 रनचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. जेसन रॉयननं बटलरच्या मदतीनं 67 रनची ओपनिंग  पार्टनरशिप केली. रॉयनं 36 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 64 रन काढले. इंग्लंडच्या विजयात कॅप्टन इयन मॉर्गनचंही योगदान होते, त्याने 21 रन काढले.

राहुल द्रविड झाला होता शेवटच्या क्षणी नर्व्हस, चहरला पाठवला खास मेसेज

पाकिस्तानकडून मोहम्मद हाफिजनं 28 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर इमाद वासीम, हसन अली, उस्मान कादीर आणि शादाब खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, England, Pakistan