Home /News /sport /

धक्कादायक! शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी क्रिकेटपटूला मैदानात अटक

धक्कादायक! शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी क्रिकेटपटूला मैदानात अटक

शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवल्या प्रकरणी पोलिसांनी एका क्रिकेटपटूला अटक (Cricketer Arrested for sex chat with minor school girl) केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी क्रिकेटच्या मैदानात प्रवेश करत त्याला बेड्या ठोकल्या.

    मुंबई, 28 जुलै : क्रिकेटपटू हे बहुतेकदा त्यांच्या मैदानातील कामगिरीमुळे नाव कमावतात. खेळातील कामगिरीच्या जोरावरच त्यांनी नाव कमावावं अशी सर्वांची अपेक्षा असते. काही क्रिकेटपटू मात्र त्यांच्या वर्तनानं या खेळाचं नाव खराब करतात. त्यांच्या या वर्तणुकीमुळे अनेकदा त्यांचे करिअर देखील समाप्त होते. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवल्या प्रकरणी पोलिसांनी एका क्रिकेटपटूला अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी क्रिकेटच्या मैदानात प्रवेश करत त्याला बेड्या ठोकल्या. इंग्लंडचा 29 वर्षांचा क्रिकेटपटू डेव्हिड हायमर्स (David Hymers) असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. डेव्हिडला पोलिसांनी क्रिकेटच्या मैदानातच  (England Club Cricketer Arrested) अटक केली. टाइमनाऊथ क्रिकेट क्लबच्या मैदानात पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्या अटकेनंतर या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. कसा झाला पर्दाफाश? या प्रकरणात 'द मिरर' या वृत्तपत्रामधील बातमीनुसार डेव्हिडचा पर्दाफाश करण्यासाठी 'गार्डियन्स ऑफ द नॉर्थ' नावाच्या एका ग्रुपनं सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे प्रोफाईल बनवले होते. त्या प्रोफईलला डेव्हिड सातत्याने अश्लील मेसेज पाठवत होता.  ते प्रोफाईल अल्पवयीन मुलीचे आहे, हे माहिती असूनही त्याचे हे उद्योग सुरु होते. त्यानंतर या ग्रुपनं केलेल्या तक्रारीनंतर डेव्हिडला अटक करण्यात आली आहे. डेव्हिड मागच्या वर्षी देखील याच प्रकरणात पकडला गेला होता. त्यावेळी त्याला इशारा देऊन सोडण्यात आले होते. या इशाऱ्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो नाव बदलून अल्पवयीन मुलींशी चॅट करत असे, अशी माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांनी भर मैदानात ही कारवाई केल्यानं त्याच्या टीममधील सहकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. Tokyo Olympics: महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत, दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात इंग्लंड क्रिकेटमध्ये यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. अ‍ॅलेक्स हेपनबर्ग या इंग्लिश क्रिकेटपटूला 2019 मध्ये बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर 23 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. हा आरोप कोर्टात सिद्ध झाल्यानं हेपनबर्गला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Crime news, England

    पुढील बातम्या