मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ICC Test Ranking : इंग्लंडच्या कॅप्टनला आणखी एक धक्का, विराटचंही नुकसान! पाहा कोण आहे नंबर 1

ICC Test Ranking : इंग्लंडच्या कॅप्टनला आणखी एक धक्का, विराटचंही नुकसान! पाहा कोण आहे नंबर 1

इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) दुहेरी फटका बसला आहे. त्याची टीम अ‍ॅडलेडमध्ये अ‍ॅशेस सीरिजमधील सलग दुसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाली. त्याचबरोबर आयसीसी बॅटर्सच्या ताज्या रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) त्याची नंबर 1 ची खुर्ची  गेली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 डिसेंबर :  इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root) दुहेरी फटका बसला आहे. त्याची टीम अ‍ॅडलेडमध्ये अ‍ॅशेस सीरिजमधील सलग दुसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाली. त्याचबरोबर आयसीसी बॅटर्सच्या ताज्या रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) त्याची नंबर 1 ची खुर्ची देखील गेली आहे. अ‍ॅशेस सीरिजमध्ये शतक झळकावणारा मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne)  टेस्ट क्रिकेचमध्ये नंबर वन बनला आहे. लाबुशेन त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 912 पॉईंट्ससह नंबर 1 बनलाय. त्याने जो रूटला (897 पॉईंट्स दुसऱ्या क्रमांकावर ढकललं आहे.

लाबुशेननं ब्रिस्बेन टेस्टमध्ये 74 रनची खेळी करत चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली होती. त्यानंतर त्याने अ‍ॅडलेडमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक (103 आणि 51) झळकावले. त्याचे हे टेस्ट कारकिर्दीमधील सहावे तर  अ‍ॅशेस सीरिजमधील पहिलेच शतक आहे. या शतकामुळे ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा 275 रननं पराभव करत मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये शून्यावर आऊट झाला होता. विराटला याचा फटका बसला आहे. तो टेस्ट रँकिंगमध्ये एक क्रमांक खाली घसरत सातव्या क्रमांकावर आहे. विराटकडं 756 रेटिंग पॉईंट आहेत. रोहित शर्मा 797 पॉईंट्ससह टॉप फाईव्हमध्ये कायम आहे. या दोघांशिवाय अन्य एकही भारतीय बॅटर टॉप 10 मध्ये नाही.

जयसूर्या आणि कालुवितरणाची जोडी टीम इंडियाकडून खेळणार , वर्ल्ड कपमध्ये करणार धमाल

बॉलर्सच्या रँकिंगमध्ये फार बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) टेस्ट रँकिंगमध्ये अजूनही नंबर 1 वर आहे. त्याने पहिल्या टेस्टमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. भारतीय ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.  अश्विननं न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या 2 टेस्टच्या सीरिजमध्ये 14 विकेट्स घेतल्या. तो या वर्षातील टेस्ट क्रिकेटमधील सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे.

First published:

Tags: Icc, Joe root, Virat kohli