नवी दिल्ली, 8 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या कॅबिनेट विस्तारात (Modi govt cabinet expansion) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय (Anurag Thakur Sports Minister) सोपवण्यात आले आहे. ठाकूर यापूर्वी अर्थराज्यमंत्री होते. त्यांना मोदी सरकारने प्रमोशन देत कॅबिनेट मंत्री केले आहे. टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) सूरु होण्याच्या दोन आठवडे आधी मोदी सरकारनं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. अनुराग ठाकूर हे मे 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष होते. यापूर्वी त्यांनी बोर्डाचे सचिन आणि हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे (HPCA) अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांचे भाऊ अरुण धूमल हे सध्या बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आहेत. हरभजन आणि शास्त्रीची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर क्रीडामंत्री होताय क्रिकेट विश्वातून त्यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) या विषयावर ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने ‘तरुण, गतीमान, खेळ बद्दल आपुलकी आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला क्रीडा मंत्री केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी देखील माजी बीसीसीआय अध्यक्ष क्रीडा मंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Young, dynamic, passionate for sports with lots of experience in sports administration. Prime Minster @narendramodi ji couldn’t have picked a better sports minister for India. Many many congrats @ianuragthakur
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 7, 2021
Great to see a former @BCCI President become the Sports Minister in the Union cabinet. Congratulations on the double whammy @ianuragthakur ji 🇮🇳 pic.twitter.com/RDL4WpmSNh
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) July 7, 2021
Happy Birthday Ganguly: क्रिकेट नाही तर ‘या’ खेळात करायचे होते गांगुलीला करियर, वाचा कसा बनला आक्रमक बॅट्समन अध्यक्ष झाल्यानंतर खेळली फर्स्ट क्लास मॅच अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशकडून एक फर्स्ट क्लास मॅच खेळली आहे. यामध्ये त्यांनी 2 विकेट्स घेतल्या. ठाकूर यांनी जम्मू काश्मीरच्या विरुद्ध पदार्पण केले होते. विशेष म्हणजे ठाकूर यांनी 2000 साली हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ठाकूर यांना युवा टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य व्हायचे होते. या समितीचे सदस्य होण्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव असणे आवश्यक होते. त्यामुळे ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशकडून एकमेव फर्स्ट क्लास मॅच खेळली.