लंडन, 16 जुलै : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिका (England vs Pakistan ODI Series) इंग्लंडने 3-0 या फरकाने जिंकली आहे. इंग्लंडच्या दुय्यम टीमनं पाकिस्तानचा तीन मॅचमध्ये पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमवर (Babar Azam) जोरदार टीका झाली आहे. पाकिस्तानने तिसऱ्या वन-डेमध्ये 331 रनचा विशाल स्कोअर केला होता. तरीही इंग्लंड विरुद्ध त्यांचा 3 विकेट्सं पराभव झाला. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि ऑल राऊंडर शादाब खान (Shadab Khan) यांच्यात मैदानातच वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. तिसऱ्या वन-डेमध्ये पाकिस्तानची बॉलिंग सुरु असताना हा प्रकार घडला. हॅरीस राऊफवर इंग्लंडच्या लुईस ग्रेगरीनं हवेत उंच फटका मारला. तो कॅच विकेट किपर सर्फराज अहमदच्या जवळ होता. मात्र मिड ऑफवरुन शादाब खान धावत तिथपर्यंत पोहचला आणि त्याने कॅच घेतला. शादाबनं कॅच घेतलेला पाहून सर्फराज चांगलाच Sarfaraz Ahmed-Shadab Khan fight video) संतप्त झाला. त्याने मैदानातच शादाबला सुनावलं. ग्रेगरी आऊट झाल्याचा आनंद देखील शादाबनं व्यक्त केला नाही.
Taptaan bichara end main substitute fielder ke torr pe aya aur wahan pe bhi zaleel hogaya. Hate to see the end of #Sarfraz like this, a player like Shadab whom he had mentored is blaming him for leaving a catch in quite some fashion on an international stage 🤦🏻♂️ #ENGvsPAK #Shadab pic.twitter.com/URJki3MW0P
— Hashim Imran (@Hashue) July 14, 2021
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये बाबर आझमनं 158 रनची खेळी केली. यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराचा वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर हा विक्रम होता. 2008 साली मलिकने भारताविरुद्ध नाबाद 125 रन केले होते.बाबरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला 332 रनचं आव्हान दिलं होतं. जेम्स विन्सीचं (James Vince) शतक आणि लुईस ग्रेगरीचं अर्धशतक याच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानचा 3 विकेट्सनं पराभव केला. ‘ये शाम मस्तानी…’ श्रीलंका दौऱ्यात पृथ्वी आणि गब्बरची रंगली संध्याकाळ! पाहा VIDEO पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका 16 जुलै रोजी सुरु होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 18 जुलै रोजी तर तिसरा सामना 20 जुलै रोजी होणार आहे.