जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / युवराजनं धुलाई केल्यानं धोक्यात आलं करियर! आता गाठली नवी उंची, महान बॉलरची केली बरोबरी

युवराजनं धुलाई केल्यानं धोक्यात आलं करियर! आता गाठली नवी उंची, महान बॉलरची केली बरोबरी

युवराजनं धुलाई केल्यानं धोक्यात आलं करियर! आता गाठली नवी उंची, महान बॉलरची केली बरोबरी

युवराजच्या (Yuvarj Singh) धुलाईमुळे ब्रॉडचे (Stuart Broad) करियर धोक्यात आले होते. करियरच्या सुरुवातीला झालेल्या या नामुष्कीनंतर ब्रॉडनं जिद्दीनं पुनरागमन करत नवा रेकॉर्ड केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 12 जून : युवराज सिंहने (Yuvraj Singh) 14  वर्षांपूर्वी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावण्याचा रेकॉर्ड केला होता. युवराजने इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावले होते. युवराजच्या या धुलाईमुळे ब्रॉडचे करियर धोक्यात आले होते. करियरच्या सुरुवातीला झालेल्या या नामुष्कीनंतर ब्रॉडनं जिद्दीनं पुनरागमन करत नवा रेकॉर्ड केला आहे. स्टुअर्ट ब्रॉडने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याच्या यादीत वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन कर्टनी वॉल्शची (Courteny Walsh) बरोबरी केली आहे. ब्रॉडने न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमला (Tom Latham) आऊट केल्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये 519 विकेट्स पूर्ण केले. वॉल्शने देखील 519 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध (England vs New Zealand) दुसरी टेस्ट सुरु करण्यापूर्वी ब्रॉडच्या नावावर 518 विकेट्स होत्या. त्याने दुसऱ्या दिवशीच न्यूझीलंडची पहिली विकेट घेतली. ही टेस्ट पूर्ण होण्यासाठी आणखी तीन दिवस बाकी आहेत. त्यामुळे ब्रॉड याच टेस्टमध्ये वॉल्शला मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रॉडने 148 टेस्टमध्ये 519 विकेट्स घेतल्या आहेत. तर वॉल्शन ने 132 मॅचमध्ये या विकेट्स घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीने टेस्ट कारकिर्दीमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न 708 विकेट्ससह दुसऱ्या तर भारताचा लेग स्पिनर अनिल कुंबळे 619 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलग 6 सिक्सनंतर मैदानात काय घडलं… युवराजनं केला खुलासा इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 616 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (563) पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्टनी वॉल्श आणि स्टुअर्ट ब्रॉडचा नंबर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात