Home /News /sport /

कोरोनामुळे बदललं 'या' खेळाडूचं नशीब, सचिन-लाराला जमलं नाही ते 10 व्या टेस्टमध्येच करून दाखवलं

कोरोनामुळे बदललं 'या' खेळाडूचं नशीब, सचिन-लाराला जमलं नाही ते 10 व्या टेस्टमध्येच करून दाखवलं

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यामध्ये सध्या लॉर्ड्सवर टेस्ट सुरू आहे. या टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूचं नशीब कोरोनामुळे बदललं.

    मुंबई, 5 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यामध्ये सध्या लॉर्ड्सवर टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडची दुसरी इनिंग 285 रनवर संपुष्टात आली. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 9 रनची आघाडी मिळाली होती. त्यांना न्यूझीलंडनं ही टेस्ट जिंकण्यासाठी 277 रनचं लक्ष्य दिलं आहे. न्यूझीलंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये डॅरेल मिचेलनं (Daryl Mitchell) शतक झळकावलं. त्यानं 108 रनची खेळी केली. या शतकी खेळीत 12 फोरचा समावेश होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिचेल 97 तर ब्लंडेल 90 रन काढून नाबाद होते.  मिचेलनं तिसऱ्या दिवशी पहिल्याच सेशनमध्ये शतक झळकावलं. त्यानं आणि ब्लंडेलनं पाचव्या विकेट्ससाठी 195 रनची भागिदारी केली. ब्लंडेल यावेळी दुर्दैवी ठरला. त्याचं शतक अवघ्या 4 रननं हुकलं. इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडिअममध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये डॅरेल मिचेलचा समावेश झाला आहे. मिचेलनं ही कामगिरी 10 व्या टेस्टमध्येच केली आहे. विशेष म्हणजे डॅरेल मिचेलचं नाव यापूर्वी या टेस्टच्या प्लेईंग 11 मध्ये नव्हतं. पण, न्यूझीलंडचा मिडल ऑर्डरमधील बॅटर हेन्री निकोलसचा कोरोना झाल्यामुळे मिचेलला ही संधी मिळाली. ENG vs NZ : बेन स्टोक्सला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, बोल्ड झाल्यानंतरही अंपायरनं परत बोलावलं मिचेलनं या संधीचा फायदा घेत लॉर्ड्सवर शतक झळकावत न्यूझीलंडला सन्मानजनक स्कोर गाठून दिला. लॉर्ड्सवर शतक झळकावणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. पण, अनेक दिग्गजांना या शतकानं हुलकावणी दिली आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, ब्रायन लारा या महान खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीमध्ये लॉर्ड्सवर कधीही शतक झळकावता आलं नाही. मिचेलनं ही ऐतिहासिक कामगिरी करत अनेक दिग्गजांना मागं टाकलं आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, England, New zealand

    पुढील बातम्या