मुंबई, 12 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रद्द झाली आहे. या टेस्टबाबत भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. त्याचवेळी भारतीय खेळाडूंची शेवटची टेस्ट खेळण्याची इच्छा नव्हती, असा दावा इंग्लिश मीडियानं केला आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. गावसकरांनी ‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना सांगितले की, ‘आपल्या खेळाडूंनी या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. मँचेस्टरमध्ये बॉलर्सना मदत मिळाली असती. त्या परिस्थितीमध्ये ते तिथ का खेळणार नाहीत. टीम इंडियाला सीरिज 3-1 नं जिंकण्याची संधी होती. त्यामुळे भारतीय खेळाडू शेवटची टेस्ट खेळण्यास तयार नव्हते हे मला मान्य नाही. आमचे खेळाडू खेळण्यास तयार नव्हते. हे बीसीसीआयनं जाहीर करायला हवं. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय मी हे मान्य करणार नाही.’ असंही गावसकर यांनी सांगितलं. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांच्यावरही कोरोना प्रोटोकॉल तोडण्याचा आरोप लागला आहे. त्यावरही गावसकरांनी उत्तर दिले आहे. IPL 2021: स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नवा वाद, ‘त्या’ खेळाडूंची फ्रँचायझींनी केली तक्रार ’ रवी शास्त्रींना पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातच कोरोना झाला हे कुणाला माहिती आहे का? कार्यक्रमानंतर खेळाडूंची टेस्ट झाली होती. त्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह होते. इंग्लिश मीडिया कधीही भारतीय खेळाडूंबद्दल चांगलं बोलणार नाही किंवा चांगलं लिहिणार नाही. तो नेहमीच त्यांना जबाबदार ठरवेल. सर्वप्रथम सत्य माहिती करुन घेतलं पाहिजे त्यानंतरच कुणावर आरोप करावेत,’ असं गावसकरांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







