मुंबई, 15 जुलै : पंजाब किंग्जचा (PBKS) अनुभवी खेळाडू दीपक हुडानं (Deepak Hooda) बडोदा टीम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबतची परवानगी (NOC) बडोदा क्रिकेट असोसिएशनला (BCA) मागितली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali T20 Tournament) हुडाचा बडोदा टीमचा कॅप्टन आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्याशी (Krunal Pandya) वाद झाला होता. त्यामुळे दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतली, पुढे बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुडावर कारवाई केली आणि त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं.
काय झाला वाद?
बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून माघार घेतली होती. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुडाने सय्यद मुश्ताक अलीमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुडाने केला.
कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला होता. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने मेलमध्ये लिहिलं.
इराफन पठाण निराश
दीपक हुडानं बडोदा सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर बडोदा आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इराफान पठाण (Irfan Pathan) याने निराशा व्यक्त केली आहे. किती क्रकेट असोसिएशन टीम इंडियाच्या यादीतील संभाव्य खेळाडूला असं सहज सोडतील? दीपक हुडाचं बडोदा क्रिकेट सोडणे हे खूप मोठं नुकसान आहे. तो आणखी 10 वर्ष सहज खेळू शकतो, कारण तो अजुनही तरुण आहे. एक बडोदाकर म्हणून मी निराश झालो आहे.' असं ट्विट इराफाननं केलं आहे.
How many cricket association will loose out on a player who is in the Indian team probables list? Deepak Hooda leaving baroda cricket is a huge loss. He could have easily given his services for another ten years as he is still young. As a Barodian It’s utterly disappointing!
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 15, 2021
IND vs ENG : टीम इंडियाच्या कामगिरीवर कोच नाराज, मोठ्या बदलाचा दिला इशारा
हुडा हा बडोद्याचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी, 68 लिस्ट ए मॅच आणि 123 टी-20 मॅच खेळल्या आहेत. या वादानंतर हुडा थेट आयपीएल स्पर्धत (IPL 2021) उतरला. राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 28 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. दीपक हुडाने 228.57 च्या स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 4 फोर लगावले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Krunal Pandya