मुंबई, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) यापूर्वीचा आयपीएल सिझन (IPL 2021) निराशाजनक ठरला. त्याचा संपूर्ण स्पर्धेत फॉर्म हरपला होता. तो कॅप्टन असलेल्या सनरायझर्स हैदराबादची (SRH) कामगिरी देखील निराशाजनक झाली. हैदराबादच्या मॅनेजमेंटनं त्याला स्पर्धा सुरू असतानाच आधी कॅप्टनपदावरून काढले. त्यानंतर टीममधूनही हकालपट्टी केली. वॉर्नर ही वेदना अजूनही विसरलेला नाही.
वॉर्नरनं बोरिया मुजमदार यांच्या कार्यक्रमात बोलताना ही सर्व वेदना बोलून दाखवली आहे. 'चांगली कामगिरी केलेल्या कॅप्टनला टीममधून काढलं तर काय संदेश जातो? त्यांना पहिल्यांदा माझ्याशी चर्चा करायला हवी होती. मी काही त्रास दिला नसता. मला टीममधून काढून टाकल्यावर खूप वाईट वाटले. मी नेहमी सनरायझर्सच्या फॅन्सशी कनेक्ट होतो. मी टीमसाठी चांहलीकामगिरी केली आहे.' असे वॉर्नरने यावेळी सांगितले.
क्रिकेट खेळणाऱ्या तरूण पिढीला मी माहिती आहे. त्यांना सचिन, विराट, मी, विल्यमसन किंवा स्मिथ सारखं व्हायचं आहे. त्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना काय वाटेल ? ही बाब सर्वात त्रास देणारी आहे, असे वॉर्नरने सांगितले. डेव्हिड वॉर्नरला मागील आयपीएल सिझनमध्ये हैदराबादनं 6 मॅचनंतर कॅप्टन पदावरून काढले. त्यानंतर त्यांनी केन विल्यमसनला टीमचा कॅप्टन केले. तरीही त्यांची कामगिरी सुधारली नाही. मागील सिझनमध्ये हैदराबादची टीम शेवटच्या क्रमांकावर होती.
Ashes: स्टिव्ह स्मिथने एकाच वेळी तोडले 3 दिग्गजांचे रेकॉर्ड आता विराट निशाण्यावर
वॉर्नरनं यावेळी एका कॅप्टनला काय करणे आवश्यक आहे हे देखील सांगितले. 'माझ्या मते टीममधील सर्व खेळाडूंना समजून घेणे आवश्यक आहे. त्याची पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक खेळाडूला नीट सांभाळून घेता आलं पाहिजे, असे वॉर्नरने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: David warner, IPL 2021, SRH