मुंबई, 19 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under-19 World Cup) दक्षिण आफ्रिकेनं पहिला विजय मिळवला आहे. डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा 18 वर्षांचा बॅटर या विजयाचा हिरो ठरला. ब्रेविसने युगांडा विरुद्ध दमदार शतक झळकावले. या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेला ब्रेविस टीममध्ये बेबी एबी डीव्हिलियर्स (Baby AB de Villiers) म्हणून ओळखला जातो. ब्रेविस हा एबी डीव्हिलियर्सला आदर्श मानतो. त्याची बॅटींग स्टाईल देखील डीव्हिलियर्ससारखी आहे. तसेच तो आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) टीमचा फॅन आहे. युगांडा विरुद्ध त्याने 110 बॉलमध्ये 104 रन काढले. यामध्ये 11 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. याचाच अर्थ त्याने 50 रन हे फक्त सिक्स आणि फोरच्या जोरावर काढले. दक्षिण आफ्रिकेनं 2014 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विजेतेपद जिंकून देण्याची जबाबदारी ब्रेविसवर आहे. भारताविरुद्ध अर्धशतक अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची पहिली मॅच भारताविरुद्ध (India vs South Africa) झाली होती. त्या मॅचमध्ये ब्रेविसने 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 65 रन काढले. त्याचबरोबर 2 विकेट्सही घेतल्या. पण, आफ्रिकेचे अन्य बॅटर्स फेल झाल्यानं टीम इंडियानं ती मॅच जिंकली. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात 50 रन काढले होते.
🚨 RESULT | #SAU19s WIN BY 121 RUNS
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 18, 2022
🇿🇦 The junior Proteas register their first win of the 2022 #U19CWC in style with an emphatic 121-run win over Uganda and 16.2 overs to spare.
➡️ Liam Alder 2-13
➡️ Dewald Brevis 2-18
➡️ Aphiwe Mnyanda 2-24
Next up, Ireland on Friday. pic.twitter.com/njZFDCJb1P
ब्रेविसच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं युगांडाचा 104 रनने मोठा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 231 रन काढले. त्याला उत्तर देताना युगांडाची संपूर्ण टीम 110 रनवरच ऑल आऊट झाली. आफ्रिकेची ग्रुपमधील शेवटची मॅच आयर्लंड विरुद्ध होणार आहे. ही मॅच जिंकत क्वार्टर फायनलमध्ये जाण्याची त्यांना संधी आहे. IND vs SA : टीम इंडियाला दिलासा, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मालिकेतून आऊट