जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup विजेत्या खेळाडूवर गंभीर आरोप, वाचा BCCI काय करणार कारवाई?

U19 World Cup विजेत्या खेळाडूवर गंभीर आरोप, वाचा BCCI काय करणार कारवाई?

U19 World Cup विजेत्या खेळाडूवर गंभीर आरोप, वाचा BCCI काय करणार कारवाई?

टीम इंडियाच्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) विजेत्या टीममधील खेळाडू राजवर्धन हंगर्गेकरवर (Rajvardhan Hangargekar) गंभीर आरोप झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : टीम इंडियाच्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) विजेत्या टीममधील खेळाडू राजवर्धन हंगर्गेकरवर (Rajvardhan Hangargekar) गंभीर आरोप झाला आहे. या स्टार ऑल राऊंडरवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त  ओमप्रकाश बकोरिया यांनी याबाबत बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहून तक्रार केली आहे. बकेरिया यांनी केलेल्या तक्रारीनंतरही बीसीसीआय या प्रकरणामध्ये (Rajvardhan Hangargekar Age Fraud Controversy)  कोणतीही कारवाई करण्याची शक्यता नाही. ‘स्पोर्ट्सस्टार’ नं दिलेल्या बातमीनुसार कोणत्याही राज्याकडून विशिष्ट वयोगटातील टीममध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूंची बोन टेस्टच्या आधारे तपासणी होते. राजवर्धननं 2016-17 साली सर्वप्रथम महाराष्ट्राच्या अंडर-16 टीमचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी TW3 टेस्टमध्ये त्याच्या वयाची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी राजवर्धनचे वय उपलब्ध कागदपत्राशी जुळणारे होते. यापूर्वी बकोरिया यांनी दिलेल्या पत्रानुसार राजवर्धनची सातवीपर्यंतची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. मात्र आठवीमध्ये प्रवेश घेताना मुख्याध्यापकांनी ही तारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 अशी केली. याचाच अर्थ 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी राजवर्धनचे वय 21 होते. IND vs WI : शेवटच्या मॅचपूर्वी BCCI चा मोठा निर्णय, Virat Kohli ला घरी पाठवले राजवर्धन हंगर्गेकरने नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 5 विकेट्स घेतल्या. युगांडा विरूद्धच्या सामन्यात 8 रन देत 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. राजवर्धन बॉलिंगसह चांगली बॅटींग देखील करतो. आयर्लंड विरूद्ध 17 बॉलमध्ये नाबाद 39 रनची आक्रमक खेळी करत त्याने हे दाखवून दिले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याला महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) 1.5 कोटींना खरेदी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात