• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • पाकिस्तानी बॉलरच्या चिथावणीनंतर पोलार्डच्या बॅटमधून बरसली आग! 7 बॉलमध्ये काढले 30 रन, पाहा VIDEO

पाकिस्तानी बॉलरच्या चिथावणीनंतर पोलार्डच्या बॅटमधून बरसली आग! 7 बॉलमध्ये काढले 30 रन, पाहा VIDEO

वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आक्रमक बॅटींग करत कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) टीमला आणखी एक विजय मिळवून दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 सप्टेंबर : वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आक्रमक बॅटींग करत कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) टीमला आणखी एक विजय मिळवून दिला आहे. पोलार्डच्या त्रिनबागो नाईट रायडर्सनं (TKR) खराब सुरुवातीनंतर सेंट लूसिया टीमचा 27 रननं पराभव केला. नाईट रायडर्सनं गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेतही त्यांची दमदार कामगिरी सुरु आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलरची चिथावणी सेंट लूसिया टीमला भारी पडली. नेमकं काय घडलं? टॉस गमावून पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या 12 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 68 रन केले होते. त्यानंतर कॅप्टन पोलार्ड बॅटींगला आला, त्याला सेंट लूसियाकडून खेळणारा पाकिस्तानचा बॉलर वहाब रियाझ (Wahab Riaz) याने भडकावले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला आहे. रियाझच्या या कृत्यानंतर पोलार्डनं आक्रमक बॅटींग  केली. त्यानं 29 बॉलमध्ये 41 रन काढले. पोलार्डनं या खेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. याचाच अर्थ त्यानं 7 बॉलमध्येच 30 रन काढले टीम सिफर्टनं 25 बॉलमध्ये 37 रन काढले. रियाज चांगलाच महागडा ठरला. त्याला 1 विकेट्स घेण्यासाठी 40 रन मोजावे लागले. नाईट रायडर्सनं निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 158 रन केले. त्याला उत्तर देताना सेंट लूसियाकडून आंद्रे फ्लेचरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. फ्लेचरनं एकाकी झूंज देत 55 बॉलमध्ये नाबाद 81 रन केले. त्याची टीम 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 131 रनच करु शकली. त्यामुळे नाईट रायडर्सनं हा सामना 27 रननं जिंकला. फूटबॉलचं मैदान झालं Romantic! मॅनेजरने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, संपूर्ण टीम पोस्टर घेऊन उभी नाईट रायडर्सचा या स्पर्धेतील दुसरा विजय असून त्यांची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सेंट लूसियाची टीम 3 मॅचनंतर 2 पॉईंट्ससह सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: