• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • CPL 2021: सुपर ओव्हरमध्ये हरली शाहरुख खानची टीम, पोलार्डची पॉवर फेल!

CPL 2021: सुपर ओव्हरमध्ये हरली शाहरुख खानची टीम, पोलार्डची पॉवर फेल!

त्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स (Trinbago Knight Riders vs Guyana Amazon Warriors ) यांच्यातील मॅच 20 ओव्हरनंतर टाय झाली. त्यानंतर मॅचचा निर्णय (TKR Vs GAW, Super Over) सुपर ओव्हरमध्ये झाला.

 • Share this:
  मुंबई, 2 सप्टेंबर : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) बुधवारी एक रोमहर्षक मॅच झाली. या स्पर्धेतील ही 11 वी मॅच होती.  त्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स (Trinbago Knight Riders vs Guyana Amazon Warriors) यांच्यातील मॅच 20 ओव्हरनंतर टाय झाली. त्यानंतर मॅचचा निर्णय  (TKR Vs GAW, Super Over)  सुपर ओव्हरमध्ये झाला. सुपर ओव्हरमध्ये गयाना वॉरियर्सनं बाजी मारली. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 6 रन केले होते. पण कायरन पोलार्ड (Kieron Pollard), कॉलीन मुन्रो आणि टीम सिफर्ट यासारख्या दिग्गद खेळाडूंना 6 बॉलमध्ये 7 रन करता आले नाहीत.रोमारियो शेपर्ड या विजयाचा हिरो ठरला. त्यानं सुपर ओव्हरमध्ये फक्त 4 रन दिले. गयानाचा कॅप्टन निकोलस पूरननं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. शाहरुख खानच्या (Shah Rukuh Khan) नाईट रायडर्डसची  सुरुवात खराब झाली. लेंडल सिमन्स पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर कॉलीन मुन्रो 32,सुनील नरीन 21 आणि इसारू उडानाच्या 9 बॉलमध्ये 21 रनच्या जोरावर नाईट रायडर्सनं 20 ओव्हरमध्ये 138 रन काढले. त्याला उत्तर देताना गयानाकडून शिमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी प्रत्येकी 27 रनचं योगदान दिलं. गयानाला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 8 रन हवे होते. त्यावे अकील हुसेननं फक्त 7 रन दिले. इम्रान ताहीर शेवटच्या बॉलवर आऊट झाल्यानं ही मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये नाईट रायडर्सकडून सुनील नरीननं बॉलिंग केली. गयानाकडून पूरन आणि हेटमायर बॅटींगला आले होते. पूरन तिसऱ्या बॉलवर पोलार्डकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यावेळी गयानाचा स्कोअर 2 रन होता. हेटमायरनं पुढच्या बॉलवर फोर लगावला. पण पाचव्याच बॉलवर तो आऊट झाला. त्यामुळे गयानाला सुपर ओव्हरमध्ये फक्त 6 रन करता आले. IND vs ENG: टीम इंडियामध्ये होणार एक बदल, वाचा कशी असेल Playing 11 नाईट रायडर्सची टीम  7 रनचं टार्गेट आरामात पूर्ण करेल असं वाटत होतं. गयानकडून रोमारियो शेपर्डनं (Romario Shephard) सुपर ओव्हर टाकली.  त्यानं पहिल्याच बॉलवर पोलार्डला आऊट केलं. त्यानंतरच्या चार बॉलनध्ये नाईट रायडर्सला फक्त 3 रन करता आले. शेवटच्या बॉलवर त्यांना वियजासाठी 4 रन हवे होते. पण, सिफर्टला फक्त 1 रन करता आला.
  Published by:News18 Desk
  First published: