मुंबई, 6 सप्टेंबर : गुणवत्ता आणि जिद्द असेल तर कितीही कठीण परिस्थितीवर मात करता येते. हे 16 वर्षांच्या अनिसा बानो (Anissa Bano) हिनं दाखवून दिलं आहे. एका छोट्या गावातील, शेळ्या सांभाळणारी अनिसा आता राज्य पातळीवर क्रिकेट खेळणार आहे. तिची राज्याच्या टीममध्ये बॉलर म्हणून निवड झाली आहे. तिची कहानी ही एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. पाहता-पाहता शिकली क्रिकेट ‘दैनिक भास्कर’ नं दिलेल्या वृत्तानुसार अनिसा राजस्थानमधील (Rajsthan) बारमेर जिल्ह्यातील कानासार या गावातील रहिवाशी आहे. अनिसा शाळा सुटल्यानंतर शेळ्या चरण्यासाठी घेऊन असे. तिला सुरुवातीपासून क्रिकेटची मॅच पाहण्याची आवड होती. गावात एखादी मॅच असेल तर ती बाऊंड्रीजवळ बसून तासन-तास मॅच पाहात असे. त्यानंतर अनिसानं आठवीत असल्यापासून क्रिकेट खेळण्याचा सराव सुरु केला. शेळ्या चरायला नेण्याचं काम करत असतानाच ती क्रिकेटचाही सराव करत असे. अनिसानं आधी एकटीनं सराव केला. त्यानंतर तिचे भाऊ आणि गावातील अन्य मंडीळींसोबत क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. जवळपास 4 वर्ष तिनं गावातील शेतांमध्ये सराव केला. त्यानंतर अनिसाच्या भावानं चॅलेंजर ट्रॉफीच्या ट्रायलसाठी तिच्या नावाची नोंदणी केली. अनिसाची पहिल्या ट्रायलमध्ये टॉप-30 मध्ये निवड झाली. त्यानंतर दुसऱ्या ट्रायलमध्ये तिनं टॉप 15 मध्ये जागा मिळवली. बॉलर म्हणून तिचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. T20 World Cup 2021 : टीम इंडियातील 15 सदस्य ठरले! वाचा संपूर्ण यादी क्रिकेटसाठी सहन केले टोमणे अनिसानं क्रिकेटसाठी गावातील मंडळींचे टोमणे देखील सहन केले आहेत. मुलांसोबत मुलीला का खेळवता? असा प्रश्न अनिसाच्या घरच्यांना विचारण्यात आला. अनिसानं हा सर्व त्रास सहन केला, टोमण्यांकडं दुर्लक्ष केलं. घरातील भावंडांमध्ये सर्वात लहान असणाऱ्या अनिसाला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. या सर्वांचं सध्या शिक्षण सुरू आहे. तिच्या घरातील कोणतीही व्यक्ती आजवर जिल्ह्याच्या बाहेर कधीही खेळेली नाही. अनिसाची थेट राज्याच्या टीममध्ये निवड झाली आहे. चार वर्षांपूर्वी बांऊड्रीच्या बाहेर बसून क्रिकेट पाहणाऱ्या अनिसासाठी हा स्वप्नवत प्रवास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







